मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील पेंडूर सावंतवाडा सारख्या एका छोट्याशा गावातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री. संतोष वसंत शिवापूरकर. जिद्द असेल तर आभाळही ठेंगणे असते, हे त्यांनी आपल्या प्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे.शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रवासश्री संतोष शिवापूरकर यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. घरची परिस्थिती गरीबीची, ग्रामीण भागातील मर्यादित सोयीसुविधा अशा अनेक अडचणींवर मात करत त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात ते भरती झाले .त्यांची नोकरीची सुरूवात मुंबई उपनगरे येथून झाली. पेंडूर गावातील राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती ते अधिकारी होणारे ते पहिले व्यक्ती होत.

राज्य उत्पादन शुल्क विभागात त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे.केवळ नोकरी मिळवणे हे त्यांचे ध्येय नव्हते, तर प्रामाणिकपणे लोकसेवा करणे हे त्यांचे ब्रीद होते.पालघर येथील यशस्वी कार्यकाळत्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेच्या प्रवासात राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक म्हणून अत्यंत चोख कामगिरी बजावली. पालघर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी काम करताना त्यांनी आपल्या शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष स्वभावाची मोहोर उमटवली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक आव्हानात्मक कामे लीलया पेलली.कृतज्ञता आणि निरोपदिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी ते आपल्या प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवेतून नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. या कार्यक्रमास अधिक्षक पालघर, प्रभारी उप अधिक्षक रणपिसे ,निरीक्षक श्री फडतरे, सर्व वरीष्ठ व कनिष्ठ सहकारी व कर्मचारीवर्ग आणि श्री संतोष शिवापूरकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते
