स्टोरी

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत रुपेश परब अव्वल.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर चार या प्रशालेतील पदवीधर शिक्षक रुपेश परब याने आपल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तालुका आणि जिल्हास्तरावर आपली मोहर उमटून शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करून जिल्हयात अव्वल ठरण्याचा मान मिळविला आहे. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्राचार्य राजेंद्र कांबळे, जेष्ठ अधिव्याख्याता जाधव, पवार .इत्यादी अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक सन्मानपत्र आणि गौरवचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले

विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक पद्धतीचा अवलंब केला जातो ज्ञानातील प्रगतीमुळे विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिकण्याचा अनुभव मिळावा आणि अध्यापन सोपे व्हावे यासाठी शिक्षण देण्याचाही समावेश झाला आहे यासाठी शिक्षक ऑनलाईन उपलब्ध असलेल्या प्रचंड संसाधनांचा वापर करून सतत शिकत आहे आणि शिक्षण देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून संकल्पना बद्दल सखोल ज्ञान मिळण्यास मदत होते.

अध्यापन प्रक्रियेत क्रांती घडवून आणण्यासाठी वर्ग खोल्यांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे यासाठी सातत्याने आपल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे शिकणे सोपे केले आहे यातून ॲनिमेटेड शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना प्रेरणा देते आणि प्रभावी होण्यास मदत होते. यातूनच शिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता वाढण्यास मदत होते आधुनिक युगात व्यवहारिक शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शिकण्याचा अनुभव वाढविण्यासाठी स्मार्ट बोर्ड, शैक्षणिक ॲप्स, युट्युब यासारखे सोशल मीडिया आणि इतर तंत्रज्ञान आधारित प्लॅटफॉर्म वापरतात यातून विद्यार्थ्यांची उपस्थिती सहभाग आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते यातूनच शिकण्याचे परिणाम सुधारतात या सर्व बाबींमध्ये तंत्रस्नेही शिक्षक रुपेश परब यांचे मोलाचे योगदान लाभले आहे

गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत घटकनिहाय आणि विषयनिहाय व्हिडिओ निर्मितीत तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत तब्बल अठरा सन्मानपत्र मिळवून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकावर स्थान निश्चित करून आपल्या शाळेचे नाव उज्वल केले या यशाबद्दल रुपेश परब यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Spread the love

Related posts

सतीश मुणगेकर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

news

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या जिल्हास्तरीय ज्ञानदीप पुरस्कारांचे वितरण दिमाखदारपणे संपन्न

news

रिफायनरी विरोधक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा!

news

Leave a Comment