क्राईमस्टोरी

ठाणे: हिरानंदानीतील रिकी’स बारमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना दारू; फुटपाथवर धुमाळी, पोलिस मात्र मुकं बघत!

Spread the love

ठाणे | महाराष्ट्र न्यूज : कासरवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील हिरानंदानी येथील रिकी’स बार अँड किचनमध्ये रोज रात्री उशिरापर्यंत फुटपाथवर टेबल लावून अल्पवयीन मुला-मुलींसह ग्राहकांना दारू दिली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जोरजोरात डीजे वाजवून वातावरणात धुमाळी केली जात असताना स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे डोळे मात्र बंद आहेत.बारचे मालक रिकी रमेश किशनानी आणि सनम रमेश किशनानी यांच्यावर वारंवार ११२ वर तक्रारी दाखल होत असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. बार मालक उघडपणे दावा करतात की, MLA कुमार उत्तमचंद ऐलानी यांचा पाठिंबा असल्याने त्यांचा बार कोणीही बंद करू शकत नाही.बॉम्बे उच्च न्यायालयाने या बारला नोटीस बजावली असतानाही तो निर्लज्जपणे सुसाट चालू आहे. तरुण पिढीच्या भवितव्याशी आणि कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित हा प्रकार चालू ठेवण्यामागे कोणत्या राजकीय वरदहस्ताचा आश्रय आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.महाराष्ट्र न्यूज या प्रकरणी बॉम्बे उच्च न्यायालय आणि ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तात्काळ कठोर कारवाई करून बारचा परवाना रद्द करण्याची मागणी करत आहे. अल्पवयीनांना दारू विक्रीसारख्या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष करणे नागरिकांना सहन होणार नाही.


Spread the love

Related posts

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सावंतवाडी च्या वतीने पाककला आणि वेशभूषा स्पर्धेचे आयोजन.

प्रसाद परब

नेपाळमध्ये ५ परदेशी नागरिक असलेले हेलिकॉप्टर बेपत्ता!

news

BSNL 4G टॉवरसाठी ना हरकत दाखला न मिळाल्यास शशांक माने यांचा उपोषणाचा इशारा!

news

Leave a Comment