दोडामार्ग: बोडदे गावातील प्रगतीशील शेतकरी श्री. फटी गणेश नार्वेकर यांनी मुलांना पांरपारिक शेती व आधुनिक शेती यांचे ज्ञान दिले. आजकाल शेती करण किती महत्वाचे आहे या बद्दल त्यांनी मुलांना कृतीयुक्त माहिती दिली. निसर्ग मानव यांचे नात आपण वर्षानुवर्षे जपत आलोय व ही परंपरा तुम्ही पुढे घेवून जावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मुलं या संवादात एकाग्र झाली आणि आपणही आपल्या आई वडीलां सोबत शेतात उतरावं असं त्यांनी ठरवल हे त्यांच्या बोलण्यातून दिसून आलंशाळा बोडदे चे अनेक उपक्रम यशस्वी होतात व मुलं स्पर्धा परिक्षा, जिल्हा क्रीडा स्पर्धा, नृत्य गायन यात यशस्वी होतात. श्री. फटी नार्वेकर, सौ. नार्वेकर व अध्यक्ष सौ. साक्षी नाईक, उपाध्यक्ष शितल गवस व सर्व मुलांचे पालक, ग्रामस्थ बोडदे शिक्षक गोपाळ पाटील, मंजुश्री परब व मुख्याध्यापक श्री. महेश नाईक यांनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
