स्टोरी

कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची तडकाफडकी बदली..!

Spread the love

संपादकीय ✍🏻: कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या घटनेची सामाजिक पातळीवर, पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कठीण गुन्ह्यांचा तपास लावून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेषतः गेल्या एका वर्षात नऊ गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करून त्यांनी गुन्हेगारी विश्वावर वचक निर्माण केला होता. असे असताना राजेंद्र मगदूम यांची ही तडकाफडकी बदली नेमकी कोणत्या कारणाने झाली? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या बदलीमागे राजकीय कारण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ शहरात सुरू असलेले अवैद्य धंदे बंद करण्यावर जास्त जोर दिला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कुडाळ तालुक्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय, अवैद्य दारू विक्री, गांजा सप्लायर यांच्यावर वचक ठेवली होती. बाहेरी राज्यातून महिला आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका बलाढ्य वेश्याव्यवसायिकाला त्यांनी चांगलाच चोप दिला होता आणि त्याचा वेश्याव्यवसाय बंद केला होता. त्यामुळे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी अनेक तरुणांना वेश्या लोकांच्या नादाला लागून बरबाद होण्यापासून वाचवलं होतं. हे नाकारता येणार नाही. त्याचप्रमाणे कुडाळ मध्ये काही ठिकाणी सुरू असलेली गोवा बनावटीची दारू विक्री ही त्यांनी बंद केली. अशाप्रकारे योग्य पद्धतीने काम करणाऱ्या एका सक्षम अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली हि कुडाळ येथील बेकायदेशीर घाणेरडे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी झाली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एका बाजूने काही राजकीय नेते सांगत आहेत की जिल्ह्यात वेश्या व्यवसाय, मटका व्यवसाय, अवैध दारू धंदे, ड्रग्ज विक्री आणि इतर कोणत्याही प्रकारचे गैरव्यवसाय हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत. आणि एका बाजूने विचार करता असे व्यवसाय बंद करणाऱ्या पोलीस निरीक्षक मगदूम सारख्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात येते. यावरून नेमकं समाजात चाललंय तरी काय? कायदा सुव्यवस्थेचे वारे कोणत्या बाजूने वाहतात? असे प्रश्न उपस्थित होतात. पोलीस निरीक्षक मगदूम यांच्या बदलीनंतर आता सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे कुडाळ पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला आहे. मात्र उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची अशी अचानक बदली झाल्याने यामध्ये काहीतरी मोठं राजकारण आहे अशी चर्चा सुरू आहे. तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम सारख्या सक्षम अधिकाऱ्यांची हि तडकाफडकी बदली कुडाळ तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला पोषक ठरणार आहे. हे नाकारता येणार नाही.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी कालावधीत गावागावात तरुणाई भजनात दंग.

news

जिल्हा बँकेची दादागिरी सहन करणार नाही जशास तसे उत्तर देऊ! संदीप जगताप यांचा इशारा….

news

नायजेरियाच्या प्रतिष्ठित रिव्हर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी अमोल भगत यांची ज्यूरी सदस्य म्हणून निवड.

news

Leave a Comment