स्टोरी

विनोद आईर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित स्वामी समर्थ मठ हडपिडचे गाव समिती सचिव विनोद बाबू आईर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन ओरोस येथे सन्मानित करण्यात आले.

हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी कराड यांच्या वतीने द्वितीय राज्यस्तरीय सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार वितरण २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन श्री देव रवळनाथ रंगमंच ओरस (सिंधुदुर्गनगरी) या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी सदर पुरस्कार वितरण या संस्थेचे अध्यक्ष सुनिल फडतरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष देवदत्त सामंत यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

यावेळी दिलीप मेस्त्री, ज्ञानदेव मेस्त्री, महेश जुवाटकर, डॉ अभिनंदन मालंडकर, सुहास परब चंद्रकांत ओरसकर,माळी सर, प्रभाकर सावंत, सावंत सर, आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

दि.१३ ते १६ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर

news

आंबोली घाटात अस्वछता करणाऱ्यांना दंड, वनविभागाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू…!

news

शेतकऱ्यांसाठी ‘जल हे विश्व’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन.

news

Leave a Comment