लेखन(श्री. म. ल. देसाई): चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन, नुकतेच नाशिक येथे संपन्न झाले. भाषा प्रभु कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मभूमीगत हा साहित्य सोहळ अतिशय थाटात संपन्न साला. महाराष्ट्र सरकारच्या भाष्या मंत्रालय विभागाच्या वतीने या वैश्विक साहित्य संमेलनाचे नियोजन अतिशय प्रेरक व उत्साहवर्धक होते. मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी झटणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील संस्था, साहित्यिक, साहित्यप्रेमी यांना निमंत्रित्त करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या सीमे बाहेरील मराठी बांधवानाही या साहित्य संम्मेलनात प्रतिनिधीत्व दिले गेले होते.


विश्व पातळीवर मराठी बांधवाना तर, घरचेच वाटावे असे निमंत्रण व स्वागत करून, मायभूमीच्या लोक संस्कृतीचा परिचय, विविध कार्यक्रमातून करून दिला गेला. आयोजित ग्रंथदिंडी, शोभयात्रेतून, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरीकांच्या विविधांगी वेशभूषांना व कला सादरीकरणाला संघी देण्यात आली होती. मंचीय सर्वच कलाविष्कार, प्रबोधक, प्रेरेकव बोधक असेच होते. ग्रंथप्रदर्शन व भाषा प्रचार, प्रसार माध्यमे यांची प्रदर्शनेही साहित्य प्रेमींच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.

वैश्विक पातळीवर आपल्या मराठीचा झेंडा मानाने डौलत ठेवण्यासाठी अशी भाषा संमेलने झाली पाहिजेत. तसेच या संमेलनात, विविध बोली भाषा, कला व कलाकार यांना स्टेज देत मराठीचे पारंपारिक व आधुनिक दोन्ही रूपांचे प्रसारण कविता, कथा, नाट्य मुलाखत, स्वगत गीतातून सादर झाले. चार दिवस चाललेल्या या विश्व मराठी संमेलनाल शासन, प्रशासक, लोकप्रतिनिधी, लेखक, वाचक, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, कामगार अशा सगळ्यांच्याच सहभागाने साहित्य कुंभमेळाच च भरला होता. असेच जाणवत होते. भाविष्यातही अशाप्रकारचा उपक्रम, सातत्याने घेतला जाईल. यासाठी प्रशासनाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे.
लेखक: श्री. महादेव ल. देसाई (महामंडळ महाराष्ट्र राज्य शासन सदस्य) संपर्क: 9420408293
