मसुरे प्रतिनिधी: आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि याच एकमेव उद्देशाने येथील प्रवेशद्वाराच्या निर्मितीसाठी आपण खारीचा वाटा उचलला. पळसंब शाळेचे हे प्रवेशद्वार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आज आदर्श असे ठरले असून यासाठी सर्वानीचे प्रयत्न केलेत ते प्रयत्न कौतुकास्पद असून भविष्यातही याप्रशालेसाठी आणि या गावासाठी जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक देवगडचे माजी सभापती सचिन माणगावकर यांनी पळसंब येथे बोलताना व्यक्त केले. लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या पळसंब शाळा न. १ च्या प्रवेशद्वारचा लोकार्पण सोहळा गुरुवारीमोठ्या उत्साहात उद्योजक श्री. सचिन मानगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग श्री राजेंद्र पराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फित कापून लोकर्पण करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर म्हणालेतआज या प्रशालेचे हे प्रवेशद्वार म्हणजे खऱ्या अर्थाने या गावाची एकी चे फळ आहे. येथील सर्व ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, लोकप्रतिनिधी, शाळा कमिटी सदस्य यांनी तन-मन-धन अर्पण करून काम केल्यामुळेच असे सुंदर प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळाले. पळसंब गावात यापूर्वी अनेक उच्चपदस्थ सर्व क्षेत्रातील अधिकारी, खेळाडू कलाकार निर्माण झाले होते.भविष्यात येथील मुलेही उच्चशिक्षित होऊन या गावाचे नाव निश्चितच रोशन करतील.

या वेळी पळसंब सरपंच श्री. अविराज परब, गटशिक्षणाधिकारी मालवण श्री. संजय माने, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर सरिता संजय कदम, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर प्रशिक्षका अर्चना अशोक गोउल्कर, केंद्रप्रमुख श्री. देऊ जंगले,सौ . सरिता पवार, शाळा समिती अध्यक्ष श्री. रविकांत सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विनोद कदम सर, मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. अशोक बागवे, श्री. दिगबर साटम, श्री. प्रमोद सावंत, .श्री पिठ्या सावंत, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश परब, माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, सौ. पुनम गोलतकर पोलीस पाटील अनुष्का परब, पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, विपूल जुवेकर, श्री.सुरेश गावकर ,श्री. अरुण पुजारे, राजन पुजारे, अनिल पुजारे, दिवाकर पुजारे, श्री.विलास सावंत गुरुजी, श्री. राजेद्रप्रसाद गाड, अपूर्वा पवार, माजी शिक्षक सौ. सोनगट्टे मॅडम, सौ. गवाणकर मॅडम, मधुकर परब, विजय पुजारे, दशरथ सावंत, सुनिल मुणगेकर, रमेश मुणगेकर, रामकृष्ण पुजारे अमरेश पुजारे, अमित पुजारे, प्रमोद पुजारे, अरुण पुजारे, पंचक्रोशीतील शिक्षक ग्रामस्थ महिला मुले मोठया संख्येने उपस्थित होती.
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर सरिता संजय कदम आणि आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर प्रशिक्षिका अर्चना अशोक गोउल्कर यांना त्यांनी आजवर केलेल्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून पळसंब प्रशालेच्या वतीने मानपत्र स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन महिला दिनाचे औचित्य साधून विशेष गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर सरिता संजय कदम म्हणाल्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपण झगडून आज देशपातळीवरती एक आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर म्हणून नाव कमावले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांनी सुद्धा असेच खडतर मेहनत घेऊन या भूमीचे नाव विविध क्षेत्रात उज्वल करावे. या प्रशालेचे मुख्याध्यापक विनोद कदम सर यांचेही कार्य अतूट असून त्यांच्या कार्यालाही सलाम.शाळेच्या मुलांनी लेझिन नृत्य सादर करत कार्यक्रमांत शोभा वाढवली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला.
तसेच उपस्थित मान्यवरानी पळसंब गावाच्या एकजुटीचे कौतुक करत लोकसहभागातून उभारलेल्या प्रवेशद्वाराचे कौतूक करत असे प्रवेशद्वार मराठी शाळेचे सिंधुदुर्गात कुठे पाहायला मिळाले नाही असे उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.उपस्थित मान्यवरांनी प्रशालेचे मुख्याध्यापक विनोद कदम सर यांच्या कार्याचे सुद्धा कौतुक केले.रात्रौ 10 वाजता दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळ यांच्या नाटय प्रयोगाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.त्यावेळी गावातील रहिवाशी मुंबईकर चाकरमानी माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.सर्व दात्याचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले .
