स्टोरी

बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव २७ जुलै रोजी!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील मसुरे गावची मूळमाया अशी ओळख असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यातील देवीचा वार्षिक जत्रोत्सव २७ जुलै २०२४ रोजी संपन्न होत आहे. पावसाळ्यात होणारा हा एकमेव जत्रोत्सव असल्याने मोठ्याप्रमाणात मुंबईकर चाकरमानी, देवीचे राज्याबाहेरील भक्त सुद्धा या जत्रोत्सवास उपस्थिती दर्शवतात. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असल्याने भाविकांचा जनसागर यादिवशी बिळवस येथे दिसून येतो.

जत्रोत्सवाच्या दिवशी म्हणजे २७ जुलै रोजी सकाळी विधीवत पूजन झाल्यानंतर भाविकांच्या ओट्या भरण्यास प्रारंभ होणार आहे. या उत्सवाची सांगता त्याच दिवशी सायंकाळी होणार आहे.  भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणे, तसेच ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सातेरी देवालय ट्रस्ट व समस्त बिळवस ग्रामस्थ यांच्या  वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

विदर्भवाद्यांकडून ‘नागपूर करारा’ची होळी ! ३० सप्‍टेंबरला आष्‍टी हुतात्‍मा ते कौंडण्‍यपूरपर्यंत पदयात्रा !

news

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी पोलीस स्थानकात रक्षाबंधन सण साजरा.

news

माणगाव येथे “इनरव्हील”,या महिलांच्या सेवाभावी संस्थेमार्फत शेती क्षेत्राला प्रत्यक्ष भेट

प्रसाद परब

Leave a Comment