Uncategorized

पेडणेमार्गे एसटी बससेवा लवकरात लवकर सुरु करा..! सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर.

Spread the love

सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस पेडणे ( गोवा ) बसस्थानकावरून जात असल्याने सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून त्यामुळे बससेवा सरळ मार्गे सुरू करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.

पेडणे ( गोवा ) येथील रस्ता अरुंद व एकेरी मार्ग असल्याने समोरून बस किंवा इतर वाहने आल्यास त्या वाहनाला बाजू देईपर्यंत भरपूर उशीर होतो. त्यामुळे मुख्य महामार्गांवर बस व इतर वाहनांना यायला बराच कालावधी लागतो.

पेडणे ( गोवा ) येथून प्रवाशांना इतर बसेसची सोय असल्याने एसटी बसचे उत्पन्न वाढत नसल्या कारणाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कणकवली ( सिंधुदुर्ग ) यांनी त्वरित लक्ष घालून सकाळी 06.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत व सायंकाळी 05.00 वाजता नंतरच्या एसटी बस सरळमार्गे सोडाव्यात. तसेच पणजी – वेंगुर्ला शेवटच्या एसटी बसचा कालावधी वाढवून तो सायंकाळी 05.00 वाजता ऐवजी 06.15 वाजता करण्यात यावा. व नोकरदार प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी. अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. तरी महाराष्ट्र राज्य व गोवा राज्य शासनाने लवकरात लवकर पाठपुरावा करण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  दिनेश मयेकर यांनी केली आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज येथे उद्या शिवसेनेचे आंदोलन.

news

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

प्रसाद परब

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ तालुक्याचा शिवगर्जना मेळावा…

news

Leave a Comment