स्टोरी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी पोलीस स्थानकात रक्षाबंधन सण साजरा.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने रक्षाबंधन निमित्त सावंतवाडी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना राखीचे रक्षाबंधन बांधून पोलिस कर्मचाऱ्यांना समाज रक्षण तर आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वास्थ रक्षणाचे वचन दिले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या अनोख्या रक्षाबंधनाने पोलीस कर्मचारी भारावून गेले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी समाज रक्षणासाठी तर योग्य कर्मचाऱ्यांनी स्वास्थ रक्षणासाठी तत्पर राहण्याचे वचन दिले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सावंतवाडी शहर प्रमुख ज्ञानेश्वर गवळी, जिज्ञासा संयोजक स्नेहा धोटे, तेजल कित्तुरे, उत्तरा पेडणेकर, प्रतिक्षा चन्ने आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कारिवडे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रशांत राणे यांची निवड.

news

स्वच्छता मोहिमेनंतरही एस्.टी. बसस्थानके अस्वच्छ का? सुराज्य अभियान

news

एस. आर. वाय. प्रोडक्शनचे ‘गणपती बाप्पा तुम्ही लवकर या’ गाणे प्रदर्शित!

news

Leave a Comment