स्टोरी

राज्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंशापार…..

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: पुढील २ दिवस राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचे अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज शुक्रवारी (ता. १२) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वादळी पावसाने राज्यातून निरोप घेताच उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. राज्याच्या अनेक ठिकाणी पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. गुरुवारी (ता. ११) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद जळगाव येथे ४४.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. दरम्यान उन्हाळी हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे.तर राज्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंशापार गेला असेल आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशापेक्षा अधिक वाढ झाली असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उष्ण लाट आली होती. अकोला येथे ४३.५, धुळे ४२.० सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे.


Spread the love

Related posts

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी केली मतदान करण्यासाठी गर्दी

news

सरकारच्या नाकर्तेपणामुळे तळवडे-नेमळे रस्त्याचे काम रखडले…! केतनकुमार गावडे

news

मसुरे केंद्रशाळेच्या यशश्री ताम्हणकरने पटकावले सुवर्ण पदक.

news

Leave a Comment