राजकारण

काँग्रेस आणि भाजप या पक्षाच्या नादाला लागू नका! महादेव जानकर

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: काँग्रेस आणि भाजप या पक्षाच्या नादाला लागू नका असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं. काँग्रेस आणि भाजप हे मोठे पक्ष आहेत. यांचा सगळा कारभार दिल्लीतून चालतो. हे पक्ष आपल्याला गिळून टाकण्याचं काम करतात. भाजप असो वा काँग्रेस हे आपल्या फार हिताचे नसल्याचे महादवे जानकर यावेळी म्हणाले. जानकर हे सध्या भाजपचे मित्रपक्ष आहेत. मात्र, भाजपच्या विरोधातच त्यांनी हे वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तळात त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

मागील काही दिवसापूर्वी जानकरांनी आम्ही भाजपात असतो तर मंत्री झालो असतो. मात्र आता असा बंदोबस्त करू की, आमच्या शिवाय सरकार बनवताना त्यांना विचार करावा लागेल असे वक्तव्य केलं होतं. माझा पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनणार आहे. मला मुंबईत घरं मिळालं, आता दिल्लीत पक्षाचं ऑफिस मिळणार आहे, असंही जानकर म्हणाले होते.


Spread the love

Related posts

पालकमंत्र्यांचा जनता दरबार म्हणजे निवडणुकीचा फार्स – आमदार वैभव नाईक

news

येत्या आठ दिवसात कुडाळ आगारप्रमुख नेमा अन्यथा युवासेना स्टाईल ने आंदोलन करू! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी

news

भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

news

Leave a Comment