सावंतवाडी प्रतिनिधी: मुलींमध्ये जर धर्मप्रेम निर्माण झाले तर लवजिहादचे भय उरणार नाही. जर देशाला हिंदु राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल तर जिजाऊंची गरज आहे. आपल्या मुलींना शत्रूबोध करून दिला पाहिजे. एकटी हिंदु जनजागृती समिती काही करू शकत नाही. तर तुम्ही प्रत्येकाने सहभाग दिला तर ‘बेटी सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित’ अभियान आपण यशस्वी करू आणि सिंधुदुर्ग जिल्हा पहिला लवजिहादमुक्त जिल्हा जाहीर करूया , असे श्री.रमेश ंिशंदे म्हणाले. हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित लव जिहाद वरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. नेमळेतील हॉटेल आराध्य येथे आयोजित या व्याख्यानाला हिंदू बंधूभगिनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

श्री. रमेश शिंदे म्हणाले की, केरळमध्ये २००६ मध्ये लवजिहादची पहिली केस दाखल झाली. केरळमधून जेव्हा इस्लामिक स्टेट स्थापन झाले तेव्हा केरळमधून १३६ जण सिरीया आणि इराकमध्ये गेले. यात ३८ मुली होत्या. २२ ख्रिश्चन व १६ हिंदू मुली होत्या. या ३८ मुली अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या ताब्यात आहे. या मुलींचे एवढे ब्रेनवॉश केले गेले. जगभरात जिहादचा भस्मासूर पसरला आहे. जिहाद करणारा कुठेही जिहाद करतो. तो डॉक्टर, इंजिनिअर कोणीही असो. अमेरिकेचे ट्वीन टॉवर्स पाडणारे एरोनॉटीकल इंजिनीअर होते. आपल्याला शत्रूबोध आणि मित्रबोध हवा तर आपण टिकू शकतो. १९७१ साली झालेले बांगलादेश अत्याचार, १९९० मधील काश्मीरी हिंदूंवर महिलांवर अत्याचार झाले. १९९२ मधील अजमेर सेक्स स्कँडल झाले. तरीही लवजिहाद नाह. असे म्हणायचे का? हे सर्व का करायचे तर गजवा ए हिंद करायचे आहे. त्यासाठी त्यांना संख्या वाढवायची आहे. अख््खया हिंदुस्थानला पाकिस्तान बनवायचे आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘हर घर योद्धा’ अभियान चालवले आहे.
या अभियानाच्या माध्यमातून असे प्रशिक्षण दिले जाईल की हिंदू बांधव किमान स्वत:चे रक्षण करू शकतो. सोशल मिडीयाचा लवजिहादसाठी मोठा प्रभाव पडत आहे. रिलच्या मागे रिअल आयुष्यात होणार्या घटनांचा अभ्यास करायला हवा. सोशल मिडीयावरील अाभासी जगात फसतात आणि मुली आपल्या आयुष्याची वाट लागून घेतात. मुली आणि पालकांनी अत्यंत सावध रहायला हवे. मैत्रीच्या नावाखाली धर्मभ्रष्ट करण्याचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. धर्मासाठी राणी पद्मिनींने १६०० हिंदु स्त्रयिांसह जौहार केला अशी उदाहरणे आपल्यालाकडे आहेत. हिंदु महिला, मुली धर्मभ्रष्ट का होतात? हिंदु मुलींना कायदे माहित नाहीत. वर्षभरात लाखो मुली देशभरातून गायब होतात. यावर कधी संसदेत चर्चा होताना दिसत नाही. लवजिहाद थांबवायचा असेल तर हलाल प्रमाणित साहित्य घेणे थांबवायला हवे. कारण तो पैसा लवजिहादसाठी वापरला जातो. छत्रपती शिवरायांनी जर सर्वधर्मसमभाव असता तर नेताजी पालकर, आणि बजाजी निंबाळकरांना पुन्हा स्वधर्मात घेतले असते का? जे मुसलमान झाले अशा मावळ्यांना पुन्हा हिंदु धर्मात घेतले. छत्रपती संभाजी महाराजांनी ४० दिवस अनंत यातना सहन करूनही इस्लाम स्विकारला नाही, हे लक्षात ठेवायला हवे. सामाजिक कार्यकर्त्या सौ.प्रीती राऊत म्हणाल्या की, आपल्या मुलींना सशक्त बनवायचे आहे. एकट्याने जिहाद्याचा सामना करण्याची शक्ती तिच्यात यायला हवी. प्रत्येकाने आपले घर सशक्त केले तरी समाज सशक्त होऊ शकतो. आता युद्धाचे स्वरूप बदलले आहे जिहाद आजही सुरू आहे. आताही ते लुटत आहेत. लवजिहादच्या शस्त्राच्या माध्यमातून हे सुरू आहे. अल्पवयीन मुलींचे ब्रेनवॉश अल्पवयीन मुलींच्या माध्यमातूनच केले जात आहे. आपण सहिष्णु आहोत. हा आपला दोष झाला आहे. झाशीच्या राणीच्या घोषणा नुसती देऊ नका तसे वागा. आपल्या जीवितावर आणि अब्रुवर घाला घातला जात असेल तर स्वरक्षणासाठी दुसर्याला संपवणे हा आपला घटनात्मक अधिकार आहे. हिंदू कुटुंबांचा पूर्ण डेटा धर्मांधांकडे असतो त्यानुसार धर्मांतरीत करण्यासाठी माणसे पेरली जातात. शत्रू अद्ययावत आहे. हिंदु संघटना जेथे सक्रीय नाहीत तेथे जास्त प्रमाणात धर्मांधांच्या कारवाया होतात. मुंबईत स्टेशनजवळ मशीद असायला हवी असा पॅटर्न आहे. बीएड मुंबईत ५० टक्के मुस्लीम मुली बी.एड.साठी दाखल होत आहेत. हिंदू मुलींअभावी मुंबईतील शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षिका म्हणून भरल्या जातात. आजची मुलगी उद्याची माता आहे. ती पूर्ण परिवाराला मॅनिप्युलेट करू शकतात. त्यामुळे धर्मांधांकडून महिलांना हेरले जाते. स्वत:ला अबला समजणे बंद करा. स्वत: सशक्त व्हा आणि कुटुंबालाही सक्षम करा. शारिरीक आणि मानसिकदृष्टया सक्षम करायला हवे.

भारतात दररोज १००० महिला लवजिहादला बळी पडतात. हिंदु महिलांचे गर्भाशय आणि संपत्ती याकडे त्यांचा डोळा आहे. धर्म टिकवायचा असेल तर महिलाच टिकवू शकतात. ज्याप्रमाणे जिहाद सर्व प्रकारे केला जातो. त्याचप्रमाणे जनजागृतीसुद्धा सर्व स्तरावर व्हायला हवी. एकतेची शक्ती निर्माण करायला हवी. तर सरकार कोणाचेही असो गांभीर्याने जिहादची दखल घेईल. स्वत:च्या धर्माबद्दल अभिमान बाळगा. प्रत्येकाने आपल्या घरात असे वातावरण निर्माण करायला हवे की स्वत:च्या रक्षणाची, लढण्याची वृत्ती निर्माण होईल. नरेटीव्ह हेसुदधा एक वॉरफेअर आहे. हिंदु सरकारने हिंदूंच्या उन्नतीसाठी कटीबद्ध रहायला हवे. सरकारच्या ताब्यात असलेल्या हिंदूंच्या मंदिरांचा निधी इतर धर्मियांसाठी वापरला जातो. त्यासाठी हिंदूंची मंदिरे हिंदू भाविकांच्या ताब्यात असायला हवीत. त्यासाठी आपल्याकडे असलेला प्रत्येक मार्ग हिंदू बांधवांनी संघटीतपणे वापरला पाहिजे. सदगुरू स्वाती खाडये म्हणाल्या की, अधर्मापासून आपले रक्षण होण्यासाठी आपण उपाययोजना काढत नाही. जर धर्माचे रक्षण करत नसू तर धर्म आपले रक्षण कसे करणार? फक्त पैसा प्राण वाचवू शकत नाही. धर्मच आपले रक्षण करू शकतो. त्यासाठी धर्मशिक्षण हवे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुली लवजिहादला बळी पडल्या आहेत फक्त प्रकरणे बाहेर पडली नाहीत. कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली असून धर्म बाजूला पडला आहे. लव जिहाद करणारे आणि त्याला समर्थन करणारे यांची एक लॉबी आहे. आपल्या मुलींवर लक्ष ठेवा. वेळ निघून गेल्यावर आक्रोश करण्यात काही उपयोग नाही. लवजिहादला बळी पडलेल्या प्रत्येक मुलीचे आयुष्य नरक झालेले आहे. केरला स्टोरीचे भाग प्रसिद्ध होऊनही भारतात हिंदू मुलींवर काही फरक पडलेला नाही. साम्यवादी इकोसिस्टीम हिंदू धर्मात स्त्री सुरक्षित नाही असा खोटा नॅरेटीव्ह पसरवत आहे. यासाठी धर्मशिक्षणाची गरज आहे. हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षण विनामूल्य देत आहे. महिलांनी श्रृंगार करावा. परंतु त्यात एक तरी श्रृंगार शौर्याचा असू दे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.हेमंत मणेरीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शंखनाद करण्यात आला. सुमारे १ हजाराहून अधिक हिंदू बंधुभगिनींची या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या मार्गदर्शनालाj उपस्थिती दर्शवली.
