स्टोरी

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळ चे कार्य उत्तम आहे. साहित्य चळवळ अधिक प्रभावीपणे राबवा माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. गुरु पौर्णिमेच्या तुम्ही मला शुभेच्छा दिल्या ही खरी संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांची भेट आहे. अशा शब्दात कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी स्पष्ट केले. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग मंडळाची आज बुधवारी सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृहावर कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे गुरुवर्य पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना ऑनलाईन गुरुवंदना देण्यात आली.

यावेळी श्री कर्णिक म्हणाले गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही मला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग वासियांच्या शुभेच्छा आहेत ही शुभेच्छा रुपी भेट मला मुंबईत सिंधुदुर्ग वासियांची मिळाली आहे असे मी मानतो सिंधुदुर्गात साहित्य चळवळ वेगाने पुढे जात आहे अजूनही हे मराठी साहित्य चळवळ अधिक प्रगल्भ करा तुम्हा सर्वांना माझे आशीर्वाद आहेत असेच काम करत रहा साहित्यिक मराठी भाषा उपक्रम सातत्याने राबवा असा संदेश दिला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर्जेदार काम सुरू आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेला शासन स्तरावरून चांगली भेट मिळाली आहे. अमराठी बांधवांना मराठी भाषा चे ज्ञान धडे द्यावेत या उपक्रमाचा समारोप १७ ऑगस्टला ठाणे येथे होणार आहे. तसेच लवकरच कोकण मराठी साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन कोकणात घेण्यात येणार आहे असे नियोजन आहे. तुम्ही मला शुभेच्छा दिला. त्याबद्दल खरंच तुम्हाला धन्यवाद असे ते म्हणाले.

यावेळी या बैठकीत ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते व कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा खजिनदार व जेष्ठ व्यक्तिमत्व आनंद वैद्य व जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांचा पाईप क्लिनजर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रांतिक सदस्य रुजारिओ पिंटो, जिल्हा सचिव ॲड.संतोष सावंत, मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर, कुडाळ तालुका अध्यक्ष संतोष वालावलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव राजू तावडे, सहसचिव सुरेश पवार आधी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव ॲड संतोष सावंत यांनी केले. तर आभार सहसचिव सुरेश पवारयांनी मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक हे आपले गुरुवर्य आहेत त्यांच्यामुळेच ही चळवळ आज व्यापकतेने पुढे जात आहे आणि त्याने आम्हाला गुरु पौर्णिमेचे आशीर्वाद दिले. हे आम्हा सर्वांना प्रेरणा देणारे आहे. अशा शब्दात गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या

जिल्हा कार्यकारणीच्या बैठकी जिल्ह्यातील साहित्यिकलेखकांचे पुस्तकांचे प्रदर्शन लवकरच कुडाळ येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळीजिल्हा साहित्य संमेलन महिला संमेलन तसेच विविध उपक्रम राबवण्याबद्दल चर्चा झाली दोडामार्ग व वेंगुर्ले देवगड या शाखा पुनर्जीवित करण्याबद्दल चर्चा झाली आधी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जास्तीत जास्त नवीन सभासद करून कोकण मराठी साहित्य परिषदेची व्याप्ती अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने बैठकीत निर्णय घेण्यात आले. जिल्हा अध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.या बैठकीचे अहवाल वाचन सचिव ॲड संतोष सावंत यांनी केले. यावेळी खास पाईप क्लिंजर हा पुष्पगुच्छ आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवल्याबद्दल काव्य सावंत तिचे विशेष कौतुक करण्यात आले.


Spread the love

Related posts

रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर करा! प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती नाईक नवरे यांचे प्रतिपादन

news

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे गुणवंतांचा सत्कार!

news

सांगवे पुलानजीक रिक्षा आणि इको गाडी समोरासमोर आधळून अपघातात

news

Leave a Comment