स्टोरी

कलंबिस्त हायस्कूलमध्ये योग शिक्षिका दुर्गा वाडकर यांची झुंबानृत्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत सावंतवाडी येथील योगशिक्षिका व झुंबा नृत्य प्रशिक्षक दुर्गा वाडकर यांनी विद्यार्थ्यांना झुंबा नृत्याचे प्रात्यक्षिकासहित धडे दिले. सुरुवातीला योगशिक्षिका वाडकर मॅडम यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अभिजीत जाधव सर यांनी स्वागत करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार आनंददायी शिक्षण घेता यावे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना नृत्यातून आपले शरीर व मन सुदृढ ठेवण्यासाठी सर्वांग सुंदर व्यायामाची आवश्यकता आहे यासाठी या झुंबा नृत्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या नृत्य कौशल्यांचा वापर करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा असे त्यांनी आवाहन केले. यानंतर योगशिक्षिका वाडकर मॅडम यांनी अतिशय तालबद्ध पद्धतीने झुंबानृत्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. शरद सावंत, विनिता कविटकर, किशोर वालावलकर, विलास चव्हाण,प्रकाश पावरा आदी शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


Spread the love

Related posts

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी आपत्ती प्रशासन अलर्ट!

news

तळाशिलातील बांधऱ्याचे काम योग्य रीतीने चालू! तळाशिल ग्रामस्थ

news

महागाईवर मात करत सावंतवाडीत दीड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप; मोती तलावावर विसर्जनाचा उत्साह.

newss

Leave a Comment