शिक्षण

भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण व युवानेते विशाल परब यांच्या माध्यमातून कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

Spread the love

सावंतवाडी (कलंबिस्त): भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण व भाजपचे युवानेते विशालभाई परब यांच्या माध्यमातून कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी माडखोल प्रभाग जि. प‌. सदस्या शिवानी नाईक, कलंबिस्त प्रभाग पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, कलंबिस्त उपसरपंच सुरेश पास्ते, भाजपचे युवामोर्चा मंडळ अध्यक्ष विनेश तावडे, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक राऊळ, संदेश बिडये, सुहास राऊळ, संतोष धर्णे, प्रविण सावंत,रविकमल सावंत,नंदकुमार बिडये आदी उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य वितरण करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी मदत केल्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी मा. विशालभाई परब, भाजप पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले.


Spread the love

Related posts

बिळवस हायस्कुलचा १००% निकाल!

news

एस.एस.सी. निकाल तालुक्यांत ११ शाळांचा निकाल १०० % न्यू इंग्लिश स्कूलची ज्ञानेश्वरी पागिरे केंद्रात प्रथम!

news

शासकीय शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून मिळणार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर

news

Leave a Comment