स्टोरी

चिकित्सक वृत्ती मधूनच आत्मविश्वास वाढेल..! विजय चौकेकर

Spread the love

देवगड वार्ताहर: आपणास लहानपणापासूनच प्रश्न विचारण्यास, चिकित्सा करण्यास आणि हे असे का ? ते तसे का? असे विचारण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे, आणि गप्प बस खूप शहाणा झालास असे रागावून आपली जिज्ञासा मारली गेली आहे. त्यामुळे कोणत्याही घटनेमागील कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न केलाच गेला नाही. मात्र आता आपण वैज्ञानिक दृष्टीकोन आचरणात आणला आणि बुवा बाबा करीत असलेले चमत्कार चिकित्सक वृत्तीने अभ्यासले तर तुमचा आत्मविश्वात वाढेल.असे प्रतिपादन विजय चौकेकर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक यांनी केले .

सामाजिक न्याय भवन विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन व श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ जळगाव आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व उच्चाटन या योजनेअंतर्गत जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम अंतर्गत देवगड तालुक्यातील भगवती माध्यमिक विद्यालयात कोटकामते येथेजादूटोणा विरोधी कायद्याचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत विचार मंचावर संस्थेचे सचिव सचिन कोकम,उपाध्यक्ष संजीव मेजारी, प्रशालेचे मुख्याध्यापक किरण राऊळ, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विनोद पाडावे,माजी सचिव राजेश पेडणेकर, कार्यकारी मंडळ सदस्य गुरुदास घाडी व प्रितम चव्हाण, शाळा समितीचे चेअरमन संतोष मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य आणि अभाअंनिसचे उपाध्यक्ष अजित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी विजय चौकेकर यांनी आपल्या मनात भिती कशी निर्माण होते भितीमुळे अंधविश्वास कसा निर्माण होतो यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आपण निराकरण भोंदूबाबांकडे जाऊन कसे करतो याची सविस्तर माहिती दिली यामध्ये भोंदूबावांकडे जाऊन नवस बोलणे, करणी काढणे, भानामती करणे, अंगात देवी येणे, भूत लागणे आदी प्रकार कसे घडतात याची संतांच्या अभंगातून उदाहरणे देऊन समजावून दिले.अंधश्रद्धा, जादूटोणा व तथाकथित चमत्कार यामागील वैज्ञानिक सत्य विविध प्रभावी प्रात्यक्षिकांद्वारे उलगडून दाखविले. हातातून विभूती व सोन्याची साखळी काढणे, पाण्याने दिवा पेटविणे, मंत्राने अग्नी प्रज्वलित करणे, नारळातून अग्नी पेटवून करणी काढणे, जीभेतून तार आरपार काढणे, पेटता कापूर खाणे, हवेतून ताईत काढणे,जादूई मडक्यातून अखंड पाणी हवे तेव्हा काढणे आदी प्रयोगांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देत त्यांनी अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले. संतवाङ्म,अभंग, गीते आणि कथांद्वारे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश प्रभावीपणे दिला.

कार्यक्रमातून विद्यार्थी, पालक व उपस्थित नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, विवेकनिष्ठ विचार आणि अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाज प्रबोधनासाठी अशा कार्यक्रमाची गरज मुख्याध्यापक श्री. किरण राऊळ यांनी मुलांना आणि उपस्थित पालक वर्गांना संबोधित करताना कुणाकडेही अशी कोणतीही शक्ती असूच शकत नाही. केवळ हातचलाखी आणि काही रासायनिक पदार्थांच्या सहाय्याने बुवा बाबा चमत्कार करून दाखवितात .त्यामुळे आज अशा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांची विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करून गावा गावातून असे कार्यक्रम होण्याची गरज असल्याचे सांगितले.

आमचा देवधर्मा ला विरोध नाही. मुलांशी व पालकांशी संवाद साधताना अजितव कांबळे म्हणाले की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले चव्वेचाळीस वर्ष आमचा देव धर्माला विरोध नाही मात्र देवधर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेच्या श्रद्धेचा गैरफायदा स्वतःच्या फायदयासाठी करणाऱ्या भोंदूबाबा च्या विरोधात काम करीत असल्याचे सांगितले. हिंदळेकर सर यांनी कार्यक्रमाचा उद्देश मुलांना समजावून दिला. यावेळी प्रशालेचे प्रविण कांबळे, आशिष पवार शिक्षक वृंद उपस्थित होते .पालक म्हणून सुदिक्षा मोंड, पुजा तोडकर, अंकिता दळवी, मिशाळे मॅडम, संध्या देवळी, आदिती कामतेकर, भूषण हिंदळेकर, दिनेश राऊळ, राहूळ हिंदळेकर आदी तसेच प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते .


Spread the love

Related posts

दुर्गवीर प्रतिष्ठान,महाराष्ट्रने राबवली किल्ले रामगडावर श्रमदान मोहीम!

news

गुंडू जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर .

news

घावनळेत ३ कोटी ५४ लाख आणि नेरूर येथे २ कोटी ३९ लाखाच्या रस्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ.

news

Leave a Comment