स्टोरी

मर्डे ग्रामपंचायत नाव बदलून मसुरे होण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन…! डॉ दीपक परब यांचा सातत्याने पाठपुरावा.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतचे नाव मसुरे मर्डे करावे अशी मागणी राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या जवळ कणकवली येथे मसुरे ग्रामविकास संघ मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यानी केली. दरम्यान याबाबत ग्रामविकास विभागाकडुन सकारात्मक निर्णय हॊण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल असे पालकमंत्री नितेश राणे यानी आश्वासित केल्याची माहिती डॉ. दीपक परब यांनी दिली. निवेदनात दीपक परब म्हणतात, मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतचे विभाजन झाल्या नंतर या ग्रामपंचायतचे नाव ग्रामपंचायत मर्डे असे शासन स्तरावरून बदलले गेले आहे. याबाबत स्थानिक पातळीवरती ग्रामस्थांकडून नाव बदलाबाबत कोणतीही मागणी नव्हती. असे असतानाही शासन स्तरावरती निष्काळजीपणा केल्यामुळेमसुरे हे ऐतिहासिक नाव त्यामुळे पुसले गेले आहे. याबाबत अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले असता लोकसंख्येचे कारण सांगीतले जात आहे. वस्तुतः विभाजन प्रस्ताव वेळी मुळ ग्रामपंचायतचे नाव बदलू नये असा ठराव ग्रामसभेने त्यावेळी दिला होता. तसेच यापूर्वी कांदळगाव ग्रामपंचायतचे विभाजन होवून महान हि नवीन ग्रामपंचायत निर्माण झाली पण त्यावेळी कांदळगाव हे मुळ ग्रामपंचायतचे नावामध्ये बदल झाला नाही. कोळंब ग्रामपंचायत बाबत सुद्धा असा वेगळा निर्णय प्रशासनाकडून झाला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून गावाचे नाव बदलून हा आमच्यावर अन्याय केला गेला आहे. प्रशासनाने केलेल्या तांत्रीक चुकीचा त्रास आम्हा मसुरे ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे विभाग असलेल्या पोस्ट ऑफिस, महसूल इत्यादी ठिकाणी गावाचे नाव मसुरे आहे.

निवडणूक ओळखपत्रावर मसुरे असा उल्लेख आहे. आणि ग्रामपंचायत नाव मात्र मर्डे आहे. जिल्ह्याच्या नकाशावरती सुद्धा आजही मसुरे हेच नाव अधिकृतरित्या आहे. परंतु आता मर्डे हे नाव आल्यामुळेविनाकारण अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मसुरे या नावाशी ऐतिहासिक वारसा, अस्मिता व भावनिक नाते आहे. परंतु नावा बाबतच्या गोंधळामुळे प्रशासकीय अडचणी जास्त वाढत आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून आलेल्या मतदार यादीमध्ये सुद्धा मसुरे मर्डे असा उल्लेख होता. प्रशासनाने केलेल्या या गावाच्या तांत्रीक चुकी बाबत मागील काळात संबंधित मंत्री महोदय, कोकण विभाग आयुक्त यांचे सुद्धा लक्ष वेधले आहे. यावेळी मसुरे येथील ग्रामस्थांनी, विविध संस्थांनी समाजाच्या मंडळांनीही लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी बहिष्कारही घालण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते परंतु त्यावेळी संबंधित प्रशासनाने निवडणुकीवरचा बहिष्कार मागे घ्या मसुरे नावाबाबत आपण सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा तत्कालीन प्रशासनाने दिले होते. यामुळे ग्रामस्थांनी निवडणुकीवर जा बहिष्कार सुद्धा मागे घेऊन प्रशासनाला मदत केली होती परंतु अद्याप पर्यंत याबाबत प्रशासनाने सुद्धा सहकार्य केले नाही.

कोकण आयुक्त, जिल्हा प्रशासना मध्ये सुद्धा याबाबत कुठलाही विरोध नसून शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे याबाबत पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे मसूरे ग्रामविकास संगच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मसुरे हे नाव ऐतिहासिक असून इंग्रज राजवटी वेळी मशहूरा असे या गावाचे नाव असलेचे आख्यायिका होती. या गावांमध्ये पूर्वी जलमार्गाच्या सहाय्याने मोठा व्यापार होत होता आणि म्हणूनच या गावाची ओळख मशहूर अशी होती आणि या शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन मशहूर गावाची ओळख मसुरे अशी झाली होती. परंतु ही ओळख तत्कालीन प्रशासनाने मिटवून टाकली. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत अतिशय सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले असल्याची माहिती डॉक्टर दीपक परब यांनी यावेळी दिली.यावेळी परब सहकारी पतपेढीच्या वतीने अध्यक्ष डॉ दीपक परब यांनी मंत्री महोदयांचा सत्कार केला. यावेळी भाई परब, शैलेंद्र परब, सुजित परब उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यानी यावेळी परब पतपेढीचे विविध उपक्रम, कर्ज वसुली धोरण, सदस्य संख्या, कर्ज वसुली प्रमाण, पतपेढीचा एकूण नफा पतपेढीच्या शाखा याबाबत माहिती घेतली. कर्ज वसुली प्रमाण वाढविण्याचा सल्ला देताना पतपेढीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याची माहिती अध्यक्ष डॉ. दीपक परब यानी दिली.


Spread the love

Related posts

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग च्या अध्यक्ष पदी किशोर चिटणीस यांची निवड.

प्रसाद परब

कळसुलकर हायस्कूल मधील सार्जंट अनंत अभिजीत चिंचकर यास मुख्यमंत्री शिष्यवृत्ती प्रदान 

newss

बांदा शहरातील पाण्याच्या गंभीर प्रश्नांविरोधात दोषीवर कारवाई व्हावी! वासुदेव भोगले

news

Leave a Comment