मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वा. दुग्ध अभिषेक, स. ७.३० वा. नित्य आरती. ९.०० वा. अभिषेक, १०.०० ते सायं. ९.०० वा. सुस्वर भजने, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १.०० वा. महाप्रसाद, श्री स्वामी समर्थ (यांना गुरु घेणे) गुरुदिक्षा हा कार्यक्रम सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. सर्व स्वामी भक्तांनी व ग्रामस्थांनी तिर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच ज्या स्वामी भक्तांना महाप्रसाद सेवेत वस्तू किंवा देणगी स्वरुपात सहभागी व्हायचे असेल त्यांनी मठातील सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी यांच्या वतीने अध्यक्ष दीपक सुर्वे, कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर, सर चिटणीस सुनिल खरात, उपाध्यक्ष दिनेश साळकर, चिटणीस कल्याण साळकर,खजिनदार प्रफुल्ल माळकर आणि सदस्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
