स्टोरी

अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध! शॉर्न क्लार्क

Spread the love

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भोपाळ येथे ‘सी-20’ परिषदेत संशोधनाची माहिती सादर!

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक विषयांवर अनोखे वैज्ञानिक संशोधन केले जात आहे. ऑरा आणि एनर्जी स्कॅनर आदी उपकरणे वापरून केलेले हे संशोधन प्राचीन भारतीय शिकवणीशी सुसंगत आहे. तसेच हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी विश्वाला दिलेले ज्ञानही यथार्थ असल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे संशोधन आपल्या जीवनावर सूक्ष्म जगताचा कसा प्रभाव पडतो, याचेही आकलन करून देते, अशी माहिती ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी दिली.

नुकतेच भोपाळ येथे ‘सेवा-सेवाभाव, परोपकार आणि स्वयंसेवा’ या कार्यकारी गटाने ‘सी-20’ परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत ‘स्वतंत्र सेवा योगींच्या सर्वाेत्तम पद्धती’ अर्थात् ‘एकल सेवा कार्यकर्ता’ या सत्रात श्री. क्लार्क बोलत होते. यंदाच्या वर्षी भारताकडे जी-20 परिषदेचे यजमानपद आहे. ‘सी-20’ ही ‘जी-20’ परिषदेची नागरी शाखा आहे. या वेळी *श्री. शॉन क्लार्क* यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनांतील वैशिष्ट्यपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. ‘अध्यात्म हे एक्झिमा, व्यसनाधीनता, मानसिक आजार यांसह आरोग्याशी संबंधित विविध समस्यांवर मात करण्यासाठी उपयोगी आहे. यज्ञांच्या माध्यमातूनही वनस्पती आणि मानव यांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो. संगीतातही हा आध्यात्मिक नियम लागू होतो. संगीताच्या विविध शैली आणि त्यांचा एखाद्याच्या प्रभावळीवर होणारा परिणाम यांविषयी आध्यात्मिक संशोधन करण्यात आले. यातून उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांनी गायलेल्या भक्तीगीताने व्यक्तीच्या प्रभावळीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे, तर हेवी मेटल संगीतामुळे व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे श्री. शॉन क्लार्क यांनी सांगितले.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला इतर ‘सी-20’ परिषदांमध्येही सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. 9 जून ते 12 जून 2023 या कालावधीत अरुणाचल प्रदेशातील नामसाई येथे आयोजित परिषदेमध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा सहभाग होता.

आपला नम्र, श्री. आशिष सावंत, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (संपर्क : 9561574972)


Spread the love

Related posts

कलंबिस्त ते सावरवाड असा राज्यमार्गावरील रस्त्याचे काम येत्या २१ फेब्रुवारी पर्यंत हाती घेतले जाईल..! शिवसेना जिल्हा संघटक संजू परब

news

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी सेवामार्गतर्फे अकरा कोटी रामरक्षा ,हनुमान चालीसा पठण.

news

कसबा मसुरे गावची देसरुढ ५ जुलै रोजी!

news

Leave a Comment