स्टोरी

भद्रावतीत गांजासह आरोपी अटकेत; अमली पदार्थांच्या साखळीचा तपास वेगात

Spread the love

चंद्रपूर प्रतिनिधी (महेश निमसटकर): भद्रावती शहरातील फुकट नगर परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका संशयितावर भद्रावती पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून कारवाई करत गांजासह एका आरोपीला अटक केली. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध जाळ्याचे धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, फुकट नगर येथे एक इसम अमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संजय मिश्रा यांच्या नेतृत्वात एएसआय गजानन तुपकर व त्यांच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून कारवाई केली. यावेळी आरोपी संजय सोनवणे यास पंचांसमक्ष ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, यापूर्वी २७ जुलै रोजी एम.डी. (अमली पदार्थ) बाळगल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. या दोन्ही कारवायांमुळे शहरातील अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपास अधिक वेगाने सुरू असून आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र वृत्त लिहिपर्यंत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.


Spread the love

Related posts

प्रशासनाला कधी जाग येणार? सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांचा प्रश्न….

news

४०,००० रुद्राक्षांपासून बनविली स्वामी समर्थ प्रतिमा ! जोगेश्वरीच्या स्वामी भक्तांनी साकारलेली रुद्राक्ष स्वामी प्रतिमा अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात स्थापीत…..१२ फूट लांब आणि १० फूट रुंदीची आहे प्रतिमा “

news

राजकर्ते शासन आणि प्रशासनातील अधिकारी हे लोकशाहीची दोन चाके! आ. नितेश राणे

news

Leave a Comment