क्राईम

कुडाळ पोलिसांची बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई..! ८३४५०-/ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त.

Spread the love

कुडाळ: गोवा राज्यातून सिंधुदुर्गमार्गे होणाऱ्या अवैध दारू तस्करीविरोधात कुडाळ पोलिसांच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. अवैद्यरित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यांवर काल शनिवार दिनांक १३ जून रोजी धडक मोहीम राबवून कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून गुन्हेगारांना पुराव्यासहित ताब्यात घेण्यात कुडाळ पोलिसांना यश आलं आहे. यामध्ये आरोपी क्रमांक १) मनोज आत्माराम नार्वेकर (वय ५० वर्ष) राहणार – माणगाव तालुका कुडाळ, आरोपी क्रमांक २ ) सचिन रमाकांत कोरगावकर (वय ४३ वर्षे) राहणार माणगाव बाजार, तालुका कुडाळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरा ११: ४३ वा. च्या सुमारास माणगाव होळीचा खुंट येथील पडक्या इमारतीच्या बाजूला छापा टाकून हि कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी २२५०-/ रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची कीलतानाची पिशवी सदर पिशवीत GOLDEN ACE असे लेबल असलेल्या प्लास्टिकच्या ७५० मिलिमापाच्या गोवा बनावटीच्या दारूने भरलेल्या कंपनी सीलबंद एकुण ३ बाटल्या (प्रत्येक बाटली ची किंमत ७५० /-रुपये प्रमाणे, १०२५०/- रुपये किमतीच्या डीएसपी ब्लॅक सील बंद एकूण ४१ बाटल्या, ( प्रत्येक बाटलीची किंमत २५० रुपये प्रमाणे ), १३८६०/-रुपये किमतीच्या OAKSMITH असे लेबल असलेल्या प्लास्टिकच्या मिली मापाच्या सीलबंद एकूण ४२( बाटल्या प्रत्येक बाटलीची किंमत ३३० रुपये प्रमाणे), २२५०/- रुपये किमतीच्या ROMANOV VODKA असे लेबल असलेल्या काचेच्या १८० मिली मापाच्या भरलेल्या कंपनी सीलबंद एकूण ०९ बाटल्या (प्रत्येक बाटली ची किंमत २५० रुपये प्रमाणे), १९,०८० /- रुपये किमतीच्या COMMANDAR XXX असे लेबल असलेल्या प्लास्टिकच्या १८० मिली मापाच्या गोवा बनावटीच्या दारू ने भरलेल्या कंपनी सीलबंद एकूण १०६ बाटल्या (प्रत्येक बाटली ची किंमत १८० /- रुपये प्रमाणे), १४०००/- रुपये किमतीच्या Old Monk xxx tum कंपनीच्या १८० मिली सीलबंद एकूण ५६ बाटल्या (प्रत्येक बाटलीची किंमत २५० /- रुपये प्रमाणे) ९५४०/- रुपये किमतीच्या DOCTOR BRAND असे लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या कंपनी सीलबंद एकूण ५३ बाटल्या (प्रत्येक बाटली ची किंमत १८० /- रुपये प्रमाणे), १२२२०/- रुपये किमतीच्या McDowells असे लेबल असलेल्या काचेच्या १८० मिली मापाच्या गोवा बनावटीच्या दारू ने भरलेल्या कंपनी सीलबंद एकूण ४७ बाटल्या (प्रत्येक बाटलीची किंमत २६०/- रुपये) प्रमाणे एकूण ८३४५०-/ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.

संबंधित आरोपी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास कुडाळ पोलीसस्टेशन पोलीस अधिकारी बांदेकर व पोलीस तपास अधिकारी श्री भिसे करत आहेत. कुडाळ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे मानगावं परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसात कुडाळ पोलीस, सावंतवाडी पोलीस, बांदा यांनी बेकायदेशीर दारू वाहतूक करण्याऱ्यांवर करावाईची धडक मोहीम सुरु करत अनेकांना गजाआड केल्यामुळे जिल्हातील गुन्हेगारिला आळा बसल्याचे दिसून येत आहे. तसेच पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीची जोरदार चर्चा सुरु आहे.


Spread the love

Related posts

ओव्हरलोड खडी आणि वाळू वाहतूकिकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्गकडून दुर्लक्ष!

news

नगरपरिषदेच्या पाळणेकोंड धरण येथील साडेपाच लाख रुपयांच्या पाईपांची चोरी.

news

डिजिटल अरेस्ट गुन्हयातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलीसांकडुन अटक

newss

Leave a Comment