क्राईम

“मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे”! ११२ या हेल्पलाईनवर फोन करून धमकी

Spread the love

पुणे: सोमवार दि. १० एप्रिल रोजी रात्री ११२ या हेल्पलाईनवर फोन करून धमकी दिली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” अशी धमकी फोनवरू एका व्यक्तीने दिली आणि त्याने फोन बंद केला. पोलिसांनी तत्काळ तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. राजेश मारूती आगवने (वय ४३) असे आरोपीचे नाव आहे. राजेश हा मुंबईतील धारावी परिसरात राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११२ या पोलीस हेल्पलाईनवर फोन आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारणार असल्याचे फोनवर सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. धमकीचा कॉल पुणे शहरातील वारजे परिसरातून आल्याचे समोर आले. योग्य तपास करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले त्यावेळी आरोपी दारुच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी राजेश आगवने

सोमवारी रात्री आरोपीने प्रथम ११२ वर फोन करून छातीत दुखत असून रुग्णवाहिका पाठवा, असे कळविले होते. त्यासाठी नियंत्रण कक्षातून १०८ ला कळवा असे सांगितल्यावर त्याने दुसऱ्यांदा त्याच क्रमांकावरून फोन केला. त्यावेळी आरोपीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवणार असल्याची धमकी दिली. पाोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले त्यावेळी तो दारूच्या नशेत होता.आरोपी राजेश मारुती आगवणे वॉर्डबॉय म्हणून काम करतो. तो मुंबईतील धारावी परिसरात राहतो. त्याची पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो.


Spread the love

Related posts

१९ वर्षीय महिला सुरक्षा रक्षकावर सामूहिक बलात्कार!

news

केरळमध्ये धावत्या रेल्वेत प्रवाशांना पेटवून देण्याच्या प्रकारामागे आतंकवादी संघटनांचा हात!

news

अबकारी खात्यात घोटाळा करणार्‍या वरिष्ठ कारकुनाने ११ लाख रुपये परत केलेउर्वरित पैसे भरण्याचा खात्याचा आदेश!

news

Leave a Comment