सनातन

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यशः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले, गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद

Spread the love

ओरोस: दशकानुदशकांचे अतर्गत मतभेद, मानकन्यांमधील समन्वय आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे कुलूपबंद असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांमध्ये महाराष्ट्र मंदिर मुहासंघाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा चैतन्याचा घंटानाद घुमू लागला आहे. महासंघाने राबवलेले नामसत्संग, माणगाव येथील जिल्हा मंदिर परिषद आणि प्रत्यक्ष संवाद या त्रिसूत्रीमुळे घारपीचे बंद मंदिर उघडले, माडखोलमधील विखुरलेले मानकरी एकत्र आले, तर पडवे. ओसरगाव आणि उगाडे येथील देवस्थानांनी सुव्यवस्थापन व धर्मरक्षणाची कास धरली आहे. आध्यात्मिक हानी रोखण्यासाठी महासंघाने उभारलेली ही संघटनशक्ती जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यसंघटक श्री संजय जोशी यांनी ओरोस येथील पत्रकार परिषदेत दिली.सिंधुदुर्ग नगरी या ठिकाणी झालेल्या पत्रकार पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सदगुरू सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे श्री. शरद राऊळ, श्री. यशवत परब, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील, मंदिराचे मानकरी श्री लिंग माऊली देवस्थान ओसरगावचे सर्वश्री घनश्याम राणे, श्री देव रवळनाथ मंदिर पडवे ता. मालवणचे गोविंद रामचंद्र परब, श्री माऊली मंदिर, घारपी येथील शिवराम गावडे, दीपक गावडे, विलास गावडे, श्री पावणाई रवळनाथ मंदिर, माडखोलचे दत्ताराम राऊळ, ग्रामपुरोहित जनार्दन भागवत, श्री भावई मंदिर कुणकेरी चे सुनील राऊळ, मंदिर महासंघाचे जीवन केसरकर हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पुढील माहिती पत्रकारांना देण्यात आली.

१. घारपी (ता. सावंतवाडी) २० वर्षांचा गतिरोध संपला येथील ग्रामदैवताचे मंदिर दोन दशकांपासून मतभेदांमुळे पूर्णतः बंद होते. महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही बाजूच्या मानकर्याशी समन्वय साधला. या यशस्वी चर्चेमुळे प्रदीर्घ काळाने मंदिर पूर्ववत सुरू झाले असून वार्षिक धार्मिक कार्यक्रम आता उत्साहात सुरू झाले आहेत.

२. माडखोल (ता. सावंतवाडी) नामसत्संगातून मानकऱ्यांचे संघटन : श्री पावणाई रवळनाथ मंदिरात मानकर्यामध्ये असलेल्या दुराव्यामुळे व्यवस्थापनात अडथळे येत होते. महासंघाने येथे नामसत्संग’ सुरू केल्याने मानकऱ्यांच्या विचारात बदल झाला. ईश्वरी अधिष्ठानामुळे आता सर्व मानकरी एकत्रितपणे मंदिराचा कारभार पाहत आहेत, ज्याचे संपूर्ण श्रेय ग्रामस्थ ‘नामसत्संगा’ला देत आहेत.

३. पडवे व ओसरगाव (ता. कुडाळ) परंपरेचे रक्षण : श्री देव रवळनाथ मंदिर (पडवे) आणि श्री लिंग माऊली मंदिर (ओसरगाव) ही देवस्थाने पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरेप्रमाणे चालवण्यात अडचण येत होती, मात्र माणगाव येथील जिल्हास्तरीय मंदिर परिषदेतून प्रेरणा घेऊन आणि महासंघाने करून दिलेल्या आध्यात्मिक जाणीवेमुळे येथील विश्वस्त आता आपल्या प्रथापरंपरा अबाधित राखण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

४. उगाडे (ता. दोडामार्ग) सुव्यवस्थापन आणि धर्मशिक्षण : येथील विश्वस्त मंदिर महासंघाशी जोडले गेल्यावर त्यानी मंदिराच्या पवित्र्यासाठी ठोस पावले उचलली आहेत, मंदिरात ‘वस्रसंहिता’ (ड्रेस कोड) लागू करण्यासोबतच धर्मशिक्षणाचे फलक, सामूहिक आरती आणि साधना सत्संग सुरू केले आहेत. यामुळे भाविकांमध्ये सात्विक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.”मंदिरे ही धर्माची आधारशिला आहेत. सिंधुदुर्गात घडलेला हा बदल केवळ मंदिरांचे दरवाजे उघडणे नसून ती हिंदू समाजाच्या संघटित होण्याचे लक्षण आहे, असे प्रतिपादन मंदिर महासंघाचे श्री. संजय जोशी यांनी केले.


Spread the love

Related posts

हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही ! – हिंदु जनजागृती समिती

newss

हिंदू जनजागृती समितीचा अनोखा उपक्रम ! त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदू राष्ट्रासाठी’!

news

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या ठिकाणी भारताच्या विजयासाठी ‘शतचंडी यज्ञ’ आरंभ.

news

Leave a Comment