स्टोरी

दशावतार कलावंत चेहऱ्याला रंग लावतो अन् जीभेवर सरस्वती नांदते, त्याला काय मिळत असेल तर ते लोकांचे आशीर्वाद..! दादा राणे कोनस्कर

Spread the love

सावंतवाडी: दशावतार कलावंत चेहऱ्याला रंग लावतो अन् जीभेवर सरस्वती नांदते. मात्र, आज पुरस्कार स्वीकारल्यानंतर काय बोलावं यासाठी शब्द सुचत नाही. दशावतार कलावंताला काय मिळतं असेल तर ते लोकांचे आशीर्वाद आहेत. समाजप्रबोधन करणारी कला असूनही त्याला राजाश्रय नाही ही खंत आहे. मात्र, फार मोठा लोकाश्रय या कलेला आहे. दशावतार कलेत माझी चौथी पिढी, दशावतार सादरीकरणात खूप आनंद मिळतो. दशावतार कला कोकणातच जन्मलेली असावी. आयुष्य न कळलेली कला म्हणजे दशावतार. तिचे आयुष्य कोणीही सांगू शकत नाही. दशावतारच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचं भाग्य मला लाभलं हे मी माझं नशीब समजतो. आज माझा झालेला सत्कार हा तेविसावा सत्कार आहे. श्रीराम वाचन मंदिरने केलेला आणि माझ्या जन्मभूमीत मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी लाखमोलाचा आहे असे भावस्पर्शी उद्गार सत्काराला उत्तर देताना दादा राणे कोनस्कर यांनी काढले. श्रीराम वाचन मंदिर आणि ॲड दीपक नेवगी कुटुंबियांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीराम वाचन मंदिरच्या १७५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात ॲड दीपक नेवगी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर व्याख्याते तथा नाट्य कलाकार नंदू पाटील, दीपक नेवगी पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती दादा राणे कोनस्कर, संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड.संदीप निंबाळकर, ॲड. पी. डी. देसाई, सचिव रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड संदीप निंबाळकर यांनी केले तर दादा राणे कोनस्कर यांचा परिचय ॲड.पी. डी.देसाई यांनी करून दिला. व्याख्याते नंदू पाटील व प्रसाद पावसकर यांच्या हस्ते दादा राणे कोनस्कर यांना शॉल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन ॲड दीपक नेवगी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कलाकाराने स्वमग्न न राहता सामाजिक योगदान दिले पाहिजे..! नाट्य कलावंत व्याख्याते नंदू पाटील

वाचनालय विद्येचे मंदिर आहे, देवाच्या मंदिराला सरकार निधी देतं पण, सरस्वतीच्या मंदिराचा निधी गोठवून ठेवते हे दुर्भाग्य. सरकारने वाचनालयांचा निधी रिलीज करावा. दशावतार सादर करणे अत्यंत कठीण, त्याला स्क्रिप्ट नसते, स्क्रिप्ट डोक्यात असते. त्यामुळे दशावतार कलाकारांपुढे नतमस्तक होतो. अभिनयाची गरज प्रत्येक क्षेत्रात असते. व्यापारापासून राजकारणात सगळीकडे आज प्रत्येकजण अभिनय करताना दिसून येतो. राजकारणी तर सर्वोत्तम अभिनेते असतात. कविता ही भावनेसहित यावी तर ती श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचते हे सांगताना त्यांनी काही कविता अभिनयासहित सादर केल्या. इथल्या पारितोषिकांमध्ये अडकू नका, कामं करा आणि पुढे जा असा संदेश त्यांनी कलाकार, साहित्यिकांना दिला. मराठी कलाकारांच्या नादी कोणी लागत नाही. कारण, मराठी सिने कलाकार शिस्तबद्ध असतो, तो एकाच सीन मध्ये शॉट ओके करतो. हिंदी कलाकारांचे २०/२५ रिटेक असतात. कलाकाराने स्वमग्न न राहता सामाजिक योगदान दिले पाहिजे. नाट्य आणि सिनेसृष्टीतील विविध घटना अभिनयासहित सादर करून सिने व नाट्यसृष्टी, जाहिरातीतील विविध घटनांचे, अभिनयाचे अनुभव विषद करत शासनाच्या नियमांवर देखील मिश्किल टिपण्णी करून समाजप्रबोधनपर व्याख्यान दिले.

या कार्यक्रमाला प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. जी.ए. बुवा, अभय नेवगी, दीपक पटेकर, मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम, डॉ. विनया बाड, वंदना करंबेळकर, तानाजी वाडकर, मोहन जाधव, सखी पवार, अभय परुळेकर, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, डॉ.चिंडक पाटील, श्रीम.नेवगी आदी रसिक, साहित्यिक, वाचनप्रेमी, सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक धुरी यांनी केले, आभार कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी मानले.


Spread the love

Related posts

हृदयरोगग्रस्त मुलावर मुंबईत येथे यशस्वी शस्त्रक्रिया.!  आर. बी.एस. के. अंतर्गत मिळाले उपचार.

newss

तेरवण येथे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर..! गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉक्टर राहणार उपस्थित.

news

अश्‍वगंधा औषधी वनस्पतीद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट होतो! बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांचे यशस्वी संशोधन!

news

Leave a Comment