Uncategorized

मराठी विषयाच्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत आर.पी.डी.प्रशालेचे जिल्हा तसेच राज्यस्तरावर घवघवीत यश..!

Spread the love

सावंतवाडी: मराठी भाषेचा प्रचार, वाचन संस्कृती वाढवणे आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करणे या हेतूने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा’ आयोजित केली जाते. सन २०२५-२६ यावर्षीच्या स्पर्धेसाठी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. यामध्ये कु. अश्लेषा उद्धव माळवे आणि सृष्टी गोविंद परब यांनी राज्यात चौथा क्रमांक पटकाविला असून कु. सोहम बापूशेट कोरगावकर याने _राज्यात पाचवा क्रमांक_ पटकाविला आहे.

महत्वाचे म्हणजे जिल्ह्यात आणि तालुक्यातील प्रथम तीनही क्रमांक RPD प्रशालेने पटकाविले आहेत. जिल्ह्यात प्रथम कु. तेजस्वी शैलेंद्र सगम, द्वितीय कु. अमेय आनंद आपटे आणि तृतीय कु. साक्षी रवींद्र गुरव तालुकास्तरावर प्रथम कु. शमिका परशुराम केदार व कु. महादेव संतोष परब, द्वितीय कु. जानवी प्रेमानंद मेस्त्री आणि तृतीय कु. अथर्व गुरुदास देवस्थळी असे यश संपादन केले आहे. या यशस्वितेसाठी व RPD प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी तसेच पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विक्रांत विकासभाई सावंत , उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक श्री. एन.जी.मुठे तसेच पालक , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शौचालयाच्या तुटलेल्या टाकीत पडलेल्या मोकाट बैलाची घाडी कुटुंबियांनी केली सुखरूप सुटका…

news

भरपावसात पावनखिंडीत इतिहासाचा जागर; हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘पावनखिंड मोहीम’ उत्साहात.

प्रसाद परब

Bayern Mharashtra football cup : बहुचर्चित एफसी बार्यन महाराष्ट्र फुटबॉल कप टुर्नामेंटला सुरुवात

प्रसाद परब

Leave a Comment