स्टोरी

आंबोली येथील ग्रामस्थांनी माजी नगरध्यक्ष बबन साळगावकर मानले यांचे आभार.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आंबोली घाट भ्रष्टाचार प्रकरणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कठोर भूमिका घेऊन संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आंबोली घाटातील काही विकास कामांना गती मिळाली. त्यासाठी आंबोली येथील ग्रामस्थांनी साळगावकर यांना आज प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले. तसेच संरक्षण भिंती बांधून घेण्यासाठी प्रयत्न करा अशी त्यावेळी मागणी देखील केली. याहीसाठी आपण प्रयत्न करू अशी साळगावकर यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली. याप्रसंगी आंबोली येथील ग्रामस्थ केशव जाधव, किसन पवार, प्रीतम सावंत, शशिकांत जाधव, प्रकाश जाधव त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे नेते अण्णा केसरकर, माजी नगरसेवक विलास जाधव व बंड्या तोरस्कर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

ओरोस, कसाल येथे आ. वैभव नाईक यांनी केली पूरस्थितीची पाहणी

news

शिवानी प्रकाशन मुंबई चा वर्धापन दिन मुंबई सायन येथे उत्साहात संपन्न! सिंधू पुत्र समाजसेवक संतोष महाडेश्वर यांचा अनोखा उपक्रम….

news

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर सरकारमुक्‍त होण्‍याविषयी मुंबई न्‍यायालयाने राज्‍य सरकारचे म्‍हणणे मागवले !

news

Leave a Comment