स्टोरी

संगणकृत ई ग्रंथालय निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद मार्फत प्रयत्न केले जातील..! प्रमोद कामत

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास १२८ शासनमान्य ग्रंथालय आहेत. या ग्रंथालयांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई ग्रंथालय चळवळ राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी संगणक सॉफ्टवेअर, खुर्ची, टेबल, इन्व्हर्टर, प्रिंटर, स्पीकर, कपाट, पंखेअसे साहित्य आवश्यक आहे. आजच्या बदलत्या काळात गावागावातील ग्रंथालय ही हायटेक असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण जिल्हा परिषद जिल्हा नियोजन माध्यमातून भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. गावातील ग्रंथालय यांना ग्रामपंचायतीमार्फत शासकीय भूखंड ग्रंथालयांना इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून द्यावा. तसेच भाड्याच्या जागेत ग्रंथालय चालवले जात आहेत त्या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शाळेत एक वर्ग खोली ग्रंथालयांसाठी उपलब्ध करून देण्यात यावी. अशी विनंती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या शिष्टमंडळाने केली आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कानी ही बाब घातली जाईल आणि निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ अधिक प्रगल्भ कशी करता येईल? या दृष्टीने प्रयत्न केले जातील. संगणकृत ई ग्रंथालय निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद मार्फत प्रयत्न केले जातील. असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा ग्रंथालय संघात च्या शिष्टमंडळाने काल सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांची भेट घेतली.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ॲड संतोष सावंत, गुरुनाथ मडवळ, सतीश गावडे, प्रवीण भोगटे आधी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने श्री मस्के यांनी स्पष्ट केले कि, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना जागा व साहित्य उपलब्ध करून दिल्यास ग्रंथालय चळवळ अधिक प्रगल्भतेने वाढवता येईल. नैसर्गिक वाढ होण्यासाठी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जागेचे अत्यंत आवश्यकता आहे. काही ग्रंथालयांना स्वतःच्या मालकीच्या इमारती आहेत मात्र बरीच ग्रंथालय भाड्याच्या जागेत आहेत. त्यामुळे वाचकांना आधुनिक सुविधा पुरवण्यास मर्यादा पडत आहेत. यासाठी गावात ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पटसंख्या अभावी वर्गखोल्या.रिकाम्या असतील तर त्या वर्गखोल्या इमारती गावातील सार्वजनिक ग्रंथालयांना उपलब्ध करून दिल्यास त्याचा उपयोग वाचना तसेच विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा लाभ घेता येईल. तसेच ग्रंथालयात आधुनिक सुविधा ई ग्रंथालय संगणकीकृत ग्रंथालय होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व ग्रंथालयांना संगणक, प्रिंटर्स, सॉफ्टवेअर, इन्व्हेटर, आधी साहित्य जिल्हा नियोजन च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावे. जेणेकरून डिजिटल लायब्ररी अभ्यासिका महिला विभाग, जेष्ठ नागरिक विभाग, बाल विभाग असे दर्जेदार विभाग निर्माण करणे शक्य होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२८ ग्रंथालयांना भेटी दिल्यानंतर अनेक बाबी जिल्हा ग्रंथालय संघाच्या निदर्शनास आले आहेत. त्यानुसार आम्ही आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय अधिक प्रगत व्हावी यासाठी व ग्रंथालयांना ग्रामपंचायत मार्फत शासकीय भूखंड इमारत बांधण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास गावागावातील साहित्य व ग्रंथालय चळवळ पुढे जाऊ शकते. त्यासाठी जिल्हा परिषद च्या माध्यमातून सहकार्य होणे आवश्यक आहे. असे निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ अधिक प्रगत व्हावी यासाठी निश्चितपणे त्यांचे प्रयत्न आहेत. ए आय च्या माध्यमातून हा जिल्हा प्रगत होत आहे. अशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय ही संगणीकृत होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आपण केलेल्या विनंतीचा निश्चितपणे विचार केला जाईल. गावागावातील ग्रंथालयांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अथवा माध्यमिक शाळेत वर्ग खोली उपलब्ध करून देण्यासाठी शाळेची एकंदरीत पटसंख्या आणि पुढील पाच वर्षाचा विचार करता तेथे वर्गखोली उपलब्ध आहे का? याचा सर्वे केला जाईल आणि निश्चितपणे ज्या गावात शाळेमध्ये वर्गखोली रिकामी असेल तेथे ग्रंथालययांना वर्गखोली देण्याची व्यवस्था केली जाईल. असे स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दादा साईल यांनी पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितपणे शासनाच्या माध्यमातून गावागावातील ग्रंथालयांना अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी ग्रंथालय यांच्यासाठी निश्चितपणे काय करता येईल. यासाठी प्रयत्न केले जातील. असेही त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५, ५० व १०० सेवा देणारी ग्रंथालय मोठ्या प्रमाणात आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास २५, ५०, १०० वर्ष कार्यरत असलेली शहर व गावागावात ग्रंथालय आहेत. या ग्रंथालयांना अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने भौतिक बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन च्या माध्यमातून सहकार्य होणे गरजेचे असल्याचे निवेदन यावेळी शिष्टमंडळाने दिले.


Spread the love

Related posts

पालकमंत्री नितेश राणे यांची आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी घेतली भेट!

news

पंतप्रधान मोदी ५०,००० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार!

news

पळसंब येथे ४ मे पासून धार्मिक कार्यक्रम!

news

Leave a Comment