सावंतवाडी प्रतिनिधी: धवडकी ते सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे, शिवापूर या मुख्य राज्यमार्ग १९० या रस्त्याचे रुंदीकरण दर्जेदार अशा पद्धतीत झाले आहे. त्यामुळे पुढील काळात हा रस्ता मुंबई गोवा कोल्हापूर असा जोडणारा एक पर्यटनाचा विकासाचे केंद्र बनणार आहे. सह्याद्री पट्ट्याच्या भागाला या मार्गामुळे एक नवी संजीवनी मिळणार आहे आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा मार्ग जवळपास दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून पहिल्या टप्प्याचे रुंदीकरण झाले आहे. लवकरच सांगेली ते शिरशिंगे,कलंबेस्त रुंदीकरणाचे काम केले जाईल. असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्पष्ट केले. धवडकी ते सांगेली असा या राज्य मार्गाचे रुंदीकरण दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्याचे उद्घाटन जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचेमाजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपतालुकाप्रमुख जीवन लाड, वामन नार्वेकर, उपसरपंच सुरेश पास्ते, संतोष नार्वेकर, दीपक सांगेलकर, अभय किनळोस्कर, उपविभाग प्रमुख संजय पालकर, ओबीसी तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर, अमित चव्हाण, प्रकाश सावंत, जमीन मालक रमेश नाईक, गणपत राणे, मुख्याध्यापक रामचंद्र घावरे, चंद्रकांत राणे, चेतन सावंत, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, सचिन नार्वेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री परब यांनी स्पष्ट केले कि, हा राज्यमार्ग निश्चितच या भागाच्या विकासाला एक नवी दिशा देणार आहे. आमदार दीपक केसरकर यांनी सह्याद्री पट्ट्यातील गावांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी त्यांनी हा मार्ग रुंदीकरण चे काम हाती घेतले. त्यामुळे सह्याद्री पट्ट्याचा हा दुर्गम भाग सावंतवाडी तालुका विभागाला अवघ्या अर्ध्या तासात तुम्ही शहरात च्या भागाकडे जाऊ शकता. असे रस्त्याचे काम झाले आहे. पुढील टप्पा निश्चितपणे हाती घेतला जाईल. हा मार्ग निश्चितपणे कोल्हापूर मुंबईला जोडणारा ठरेल. असे ते म्हणाले.
यावेळी उपतालुकाप्रमुख जीवन लाड यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. पुढील टप्प्याचे कामही लवकरच हाती घेतल्यास निश्चितपणे कलंबित शिरशिंगे भाग अधिक गतीने विकसित होईल. कोल्हापूरला जोडणारा पारगड मार्गे शिरशिंगे कलंबिस्त असा मार्ग व्हावा यासाठी निश्चितपणे समिती केली जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जमीन मालक रमेश नाईक व वामन नार्वेकर यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन श्री परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा सत्कार उप तालुका प्रमुख जीवन लाड यांनी केला.
