स्टोरी

साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न..! २४ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथे साईकृपा मित्र मंडळ मसुरे गढघेरा बाजारपेठ आणि रक्त केंद्र व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने साई मंदिर मसुरे येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मसुरे साई मंदिर येथील साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त साईकृपा मित्र मंडळ आणि रक्तगट व रक्त विघटन केंद्र सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारती ठोंबरे, वैद्यकीय ऑफिसर श्री सुमंगल बुगडे, सहाय्यक अधीक्षक श्रीमती आर्या कदम, रक्त विघटन वैद्यकीय अधिकारी श्री साई सावंत, भक्ती शिरसाठ, गणपत गाडगे, सचिन बिले, नितीन गावकर उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रदीप पाटकर, शिरीष प्रभूगावकर, समीर प्रभू गावकर, सुनील प्रभू गावकर, दीपक पेडणेकर, शैलेश मसुरकर, स्वप्निल दुखंडे, बिरबल शिंदे, समीर सावंत, केदार धुरी, बाळू दळवी, नयन मसुरकर, बाबू मसुरकर, उद्धव गोरे, किरण मसुरकर, रणवीर प्रभू गावकर, विक्रांत प्रभू गावकर, वाणीश शिरसाट,निधी पेडणेकर, दगडू सावंत, रुपेश दुखंडे, ओमकार दुखंडे, समर्थ दुखंडे, चेतन दुखंडे, आयुष दुखंडे, महेश शिंदे, बंडू खोत,धोंडी शिंदे,आनंद परब, निळकंठ शिरसाट, विलास परब, झुंजार पेडणेकर, सुरेश परब,संदेश सागवेकर,यशवंत परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, दीक्षा दुखंडे, अमित चव्हाण, अनिकेत चव्हाण, भुवेश चव्हाण, प्रकाश चव्हाण,निकिता मसुरकर, हार्दिक मसुरकर, मिहीर मसुरकर,मंगेश शिंदे,महेश दुखंडे, सुनील दुखंडे,अनिल दुखंडे, गोरक्ष चव्हाण आणि साईकृपा मित्र मंडळाचे सभासद उपस्थित होते. रक्तदान केलेल्या सर्व दातांचे साईकृपा मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले.फोटोमसुरे साई मंदिर येथे रक्तदान शिबिरात वैद्यकीय अधिकारी भारतीय ठोंबरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा सत्कार करताना शिरीष प्रभू गावकर, प्रदीप पाटकर आणि मान्यवर..


Spread the love

Related posts

पुण्यात हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून अमली पदार्थांची विक्री करवून घेणार्‍या मुसलमानाला अटक !

news

रेल्वे महिला प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांसंदर्भात विधान सभेच्या सभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न!

news

समीर वानखेडे यांना २३ जूनपर्यंत अटक करू नये! मुंबई उच्‍च न्‍यायालयाचा आदेश!

news

Leave a Comment