स्टोरी

‘शिक्षक भारती’चा भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळा व त्रैवार्षिक अधिवेशन २४ एप्रिल रोजी!

Spread the love

​मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, तालुका शाखा मालवणच्या वतीने २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत​ ओम गणेश मंगल कार्यालय, कट्टा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी गुणगौरव, होतकरू विद्यार्थ्यांना मदत आणि ‘कलारत्न पुरस्कार’ वितरण सोहळ्यासह शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन पार पडणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. दत्ता सामंत यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून जि.प. सिंधुदुर्गचे बांधकाम सभापती श्री. संतोष साटविलकर पंचायत समिती सभापती सौ प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, जिल्हा परिषद सदस्या सौ सुमेधा पाताडे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षक भारतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कै. राजेंद्र ठाकूर कलारत्न पुरस्काराचे वितरण, आदर्श शाळा पुरस्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाणार आहे. शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष पाताडे, ​ मालवण शाखेचे अध्यक्ष श्री. दिनकर शिरवलकर व सरचिटणीस श्री. कृष्णा कालकुंद्रीकर यांनी सर्व संबंधित शिक्षक आणि पालकांना या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Spread the love

Related posts

संच मान्यता निकष दि. १५ मार्च २०२४ चा शासननिर्णय रद्द करणेबाबत राजन तेलींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

news

सह्याद्री फाउंडेशन चा २०२४ मान्सून महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ.

news

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे चौकुळ चिखलव्हाळ बेरडकीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप..!

news

Leave a Comment