स्टोरी

आंबा व काजू पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात

Spread the love

३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी रु रक्कम देण्याचे काम सुरु.

शेतकऱ्यांनी मानले आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांचे आभार….

 सिंधुदुर्ग: आंबा व काजू फळ पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेल्या आंदोलनाला व पाठपुराव्याला यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात फळ पीक विम्याची रक्कम जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांचे आभार मानले आहेत.जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी रु रक्कम देण्याचे काम सुरु आहे. पुढील दोन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हि रक्कम जमा होणार आहे. अशी माहिती आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांनी दिली आहे.

बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा शेतकऱ्यांच्या मोबाईल वर आलेला मेसेज

 

शेतकऱ्यांना आंबा व काजू पीक विम्याची रक्कम दिली जात नसल्याने आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी १ नोव्हेंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांनी कणकवली विजय भवन येथे आ.वैभव नाईक व सतीश सावंत यांच्या समवेत बैठक घेऊन नोव्हेंबरच्या दुस-या आठवडयात संबंधित सर्व पात्र बागायतदारांच्या बँक खात्यात विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाई जमा करण्याची ग्वाही दिली होती तसे लेखी पत्र विजयकुमार राऊत यांनी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.त्यानुसार पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.


Spread the love

Related posts

कलंबिस्त येथे जिल्हास्तरीय कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास जिल्हास्तरीय शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन

news

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्यावतीने रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे देण्यात आले.

news

प्लास्टिकच्या कचऱ्यातून हिरवाई! संकल्प संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अभिनव ‘जल-वृक्ष’ उपक्रम

प्रसाद परब

Leave a Comment