क्राईमस्टोरी

बेलापूर राहुल सीमेन हॉस्टेल कॅन्टीनमध्ये धक्कादायक प्रकार; जेवणात सापडला किडा, स्टाफचा जीव धोक्यात

Spread the love

नवी मुंबई | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : CBD बेलापूर, सेक्टर २० येथील राहुल सीमेन हॉस्टेल (Aai बिल्डिंग) खाली असलेल्या कॅन्टीनमध्ये गंभीर अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा भंग उघडकीस आला आहे. या कॅन्टीनमधून नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण घेणाऱ्या असंख्य स्टाफ सदस्यांना काल १० जून २०२६ रोजी दुपारच्या जेवणात एक किडा सापडला. स्थानिक पाहणीत कॅन्टीनची अवस्था अत्यंत घाणेरडी असल्याचे समोर आले – अन्न तयार करणे, साठवणूक आणि स्वच्छता यात मोठ्या उणीवा दिसून आल्या.या प्रकारामुळे फूड पॉइझनिंगचा मोठा धोका निर्माण झाला असून, अनेक स्टाफ सदस्यांच्या जीविताला थेट धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्र FDA चे आयुक्त, वरिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई करून दोषींवर नोटीस बजावावी आणि कॅन्टीन सील करण्याची मागणी जोरदारपणे होत आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणात आरोग्य दुर्घटना घडू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. FDA प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Related posts

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून कांदळगाव येथे काजू कलमांची लागवड

news

शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी होणार “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा.

news

सिंधुदुर्ग प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर…!

news

Leave a Comment