स्टोरी

कलंबिस्त गावातील राघवेंद्र तावडे यांच्या घरावर पडलेल्या विजेच्या पोलाकडे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोणी कितीही बोलू, काही करू, आम्ही आमचं तेच खरं करणार.! अशी निर ढरवलेली वीज वितरणची यंत्रणा आहे. खरंच यामुळे सर्वसामान्य गोरगरीब वीज ग्राहक हैराण झाला आहे. सावंतवाडी शहरात तर सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त वीज वितरणचा टिकटिक दिवसातून ३० ते ४० वेळा वीज गायब होतेच. मात्र वीज अधिकारी थातूरमातूर उत्तर देऊन ग्राहकांना गप्प करत आहेत. या पलीकडेही जात गेल्या रविवारी पहाटे सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागात सह्याद्री पट्ट्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात कलंबिस्त पास्तेवाडी येथील राघवेंद्र तावडे यांच्या घरावर विजेचा पोल तुटून पडला. मात्र वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना या घटनेकडे पाहण्यासाठी वेळच नाही.

आज जवळपास चार दिवस उलटले पण वीज अधिकारी फक्त सांगता आहेत. आम्ही ठेकेदारांची माणसं पाठवली पण ती माणसं कुठे गेलीच नाहीत. एवढे मुजोरगिरी या वीज अधिकारी वर्गाची झाली. आहे गेल्या चार दिवसांपूर्वीच सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी वीज कर्मचारी मुजोरगिरी करत आहेत. असे वक्तव्य केले होते. मात्र आता जनतेलाही हे अनुभवायला येत आहे. सावंतवाडी वीज अधिकारी श्री राक्षे मात्र या सर्व प्रकारामुळे त्यांच्यावर कोणताच परिणाम होताना दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारी करून जातात आणि बैठका घेतात. पण प्रत्यक्षात अधिकारी वर्ग कुठल्याच खात्याचे ते वीज वितरण असो, महसूल असो, शिक्षण विभाग असो, सर्वच विभागात अलबेल चालू आहे. कुणाचा वालीच कोण नाही.

कलंबिस्त ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव यांनी आज सकाळी वीज वितरण च्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन जाब विचारला. जवळपास ४० घरे गेले चार दिवस अंधारात आहेत. वीज पोल घरावर पडून तसाच आहे. लाईट नाही आणि पोलही काही बाजूला केला नाही. आता आंदोलनात्मक पवित्र घ्यावा लागेल. अशी भूमिका घेतली आहे. वीज ग्राहक संघटने जिल्हा अध्यक्ष संजय लाड यांनी काल संध्याकाळी वीज अधिकाऱ्यांना सांगूनही वीज अधिकाऱ्यांनी त्यांच्या शब्दाला केराची टोपली दाखवली आहे. अशी अवस्था वीज वितरणची झाली आहे. मग जरा जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जरा अशा गोष्टींकडे लक्ष द्या. जनतेची फक्त दिशाभूल थांबवा. अशी विनंती आता जनता करत आहे.


Spread the love

Related posts

कल्याण पूर्वेतील हिंदू नव वर्ष स्वागत यात्रेत विविध विविध जाती – धर्माच्या समाज बांधवांचा उत्सुर्त सहभाग ! यात्रेत सामाजिक एकतेचा दिला अनोखा संदेश !

news

महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची विनंती ‘श्री शनैश्चर देवस्थान’ने मान्य केली!

news

यशवंतराव भोसले फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अ. जगताप यांना ‘सर्वोत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार जाहीर

news

Leave a Comment