शिक्षण

सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ संघ निवड स्पर्धा संपन्न ; ‘हे’ खेळाडू चमकले.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल आयोजित सन २०२६-२७ ची बुद्धिबळ संघ निवड कणकवली येथे पार पडली. या संघ निवडीमध्ये १७, १५, १३, ११, ९, ७ या वयोगटातील मुले व मुली यामधून निवड करण्यात आली. या निवडचाचणीमध्ये जिल्हाभरातून 40 मुलांनी भाग घेतला. यात वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, देवगड, कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी या तालुक्यातून मुलांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षण श्री. श्रीकृष्ण आडेलकर सर व श्री. सुयोग धामापूरकर सर यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. सात वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक स्वयम वालावलकर(कणकवली), द्वितीय संचित केलवलकर (मालवण).नऊ वर्षाखालील मुले – प्रथम क्रमांक – अन्वय सापळे (वेंगुर्ला),द्वितीय क्रमांक – स्वयम वालावलकर (कणकवली).नऊ वर्षाखालील मुली – प्रथम क्रमांक – ग्रीष्मा आडेलकर (कणकवली),. अकरा वर्षाखालील मुले- प्रथम क्रमांक समर्थ गावडे (मालवण), द्वितीय क्रमांक – विहान अस्पतवार (वैभववाडी). अकरा वर्षाखालील मुली – प्रथम क्रमांक – भाग्यता साळकर (मालवण), द्वितीय क्रमांक – गार्गी परब (कणकवली). तेरा वर्षाखालील मुले – प्रथम क्रमांक – समर्थ गावडे (मालवण),द्वितीय क्रमांक – विहान अस्पतवार (वैभववाडी). तेरा वर्षाखालील मुली – प्रथम क्रमांक – भाग्यता साळकर (मालवण), द्वितीय क्रमांक – ग्रीष्मा आडेलकर (कणकवली).पंधरा वर्षाखालील मुले- प्रथम क्रमांक -चेतन भोगटे (कणकवली), द्वितीय क्रमांक – रुद्र मोबारकर (वेंगुर्ला).पंधरा वर्षाखालील मुली- प्रथम क्रमांक – गार्गी सावंत (कणकवली), द्वितीय क्रमांक – वैखरी सावंत (कणकवली). सतरा वर्षाखालील मुले- प्रथम क्रमांक – चेतन भोगटे (कणकवली), द्वितीय क्रमांक – राधाकृष्ण गावकर (वैभववाडी).सतरा वर्षाखालील मुली -प्रथम क्रमांक – मीनल सुलेभावी (कणकवली), द्वितीय क्रमांक – मनस्वी सावंत (कुडाळ).

स्पर्धा यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्री. सुयोग धामापूरकर, उपाध्यक्ष श्री. सुशील निब्रे, सचिव श्री. श्रीकृष्ण आडेलकर, श्री प्रदीप जोशी, श्री. नंदन वेंगुर्लेकर, राजेंद्र तवटे, श्री रघुनाथ भोगटे, इतर व्यक्तींनी मेहनत घेतली. या स्पर्धेत निवड झालेली मुले पुणे, संभाजीनगर, सोलापूर येथे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलांना प्रमाणपत्र व विजेत्या मुलांना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले. वरील खेळाडूंनी त्या त्या गटात विजेतेपद मिळविले आहे. विजेत्या सर्व खेळाडूंचे व सहभागी सर्व खेळाडूंचे आयोजक व पालक यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

वेर्ले गावची कन्या कुमारी वेदा राऊळ सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये प्रथम.

आजगाव येथे गीताई पठण स्पर्धा उत्साहात संपन्न..!

news

अहो आश्चर्य…! आदल्या दिवशी कायम असलेले शिक्षक त्याच शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी कामगिरीवरती तर एकाची बदली.

news

Leave a Comment