Uncategorized

कणकवली येथे “चला बालपण जपूया” या बाल अत्याचार विरोधी जनजागृती पथनाट्य कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

कणकवली: सध्या महाराष्ट्र राज्यात पोलीस काका आणि पोलीस दीदी हा महाराष्ट्र पोलीस विभागामार्फत शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी सुरू करण्यात आलेला एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोलिसांविषयीची भीती दूर करणे, बाललैंगिक अत्याचार रोखणे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षिततेविषयी जागरूक करणे असा आहे. राज्यात अनेक ठिकाणी या उपक्रमाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या असून, पीडित मुलींना त्वरित मदत आणि समुपदेशन मिळत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील शालेय, कॉलेज विद्यार्थ्यांना एक मोठा मानसिक आधार मिळाला असून, पोलीस आता त्यांच्यासाठी मित्रमैत्रिणींप्रमाणे काम करत आहेत.

या पोलीस काका आणि पोलीस दीदी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून “चला बालपण जपूया” हा बाल अत्याचार विरोधी जनजागृती पथनाट्य कार्यक्रम घेण्यात आला. बॅरिस्टर नाथ पै. शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅरिस्टर नाथ पै. कॉलेज ऑफ नर्सिंग, कुडाळचे विद्यार्थी व सिंधुदुर्ग पोलीस दलाचे बँड पथक यांनी भरोसा सेल सिंधुदुर्गच्या वतीने पटवर्धन चौक कणकवली येथे हा कार्यक्रम सादर करण्यात आला. उपविभाग पोलीस अधिकारी श्री आढाव सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स.पो.नि. नलिनी शिंदे यांनी केले. यावेळी डब्ल्यू. एच.सी.९७७ सावंत, डब्ल्यू. पी. सी. ४०९ गावडे, समुपदेशक महेंद्र जाधव, महिला समुपदेशन केंद्रचे अधिकारी, पोलीस स्टेशन कुडाळचे अधिकारी, बॅरिस्टर नाथ पै. कॉलेज ऑफ नर्सिंग कुडाळचे प्राध्यापक उपस्थित आणि विध्यार्थी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या कार्यक्रला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Spread the love

Related posts

काँग्रेसमध्ये पार्ट2? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम’, थोरात-पटोले वादावर नवं ट्विट, हायकमांड काय निर्णय घेणार?

प्रसाद परब

शरद पवारांचा वर्धा दौरा, ‘मोहितेमय’ वातावरण अन् गटबाजीचे सावट…

news

फणस किंग’मिथिलेश देसाई यांचा लंडनच्‍या आस्‍थापनासमवेत करार अर्थव्‍यवस्‍थेला मिळणार चालना….

news

Leave a Comment