शिक्षण

फ्लोरेट कॉलेज येथे मोफत फॅशन डिजाईनिंग बॅचचे यशस्वी आयोजन!

Spread the love

फ्लोरेट कॉलेज मुळे फॅशन डिझायनिंग मध्ये नवीन उद्योजक निर्माण होतील: दिक्षा पुरळकर

मसुरे प्रतिनिधी: कणकवली येथे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत ८ मे रोजी पहिली पंधरा दिवसीय मोफत फॅशन डिजाईनिंग बॅच सुरु करण्यात आली होती. ह्या बॅचला सिंधुदुर्ग वासियांकडून चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री दिक्षा परुळकर, श्री. किशोर कदम, कॉलेजच्या मार्गदर्शिका सायली तलवडेकर या उपस्थित होत्या. २५ विद्यार्थ्यांची बॅच यशस्वीरित्या पूर्ण करून दिक्षा पुरळकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

बॅचचे विद्यार्थी स्वतः डिजाईन केलेल्या ड्रेस मध्येच कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसत होता. हर्षदा माईनकर, खुशी मालंडकर, पूजा सुतार यांनी आपला अनुभव व्यक्त केला. अवघ्या १५ दिवसात खूप काही प्रोफेशनल दर्जाच्या गोष्टी बॅच मध्ये शिकता आल्या व उपक्रमाचा फायदा झाला म्हणून त्यांनी कॉलेजचे आभार मानले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पुरळकर मॅडम म्हणाल्या, अशा उपक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा. फॅशन डिजाईन कौशल्य आत्मसात करून प्रत्येकाने छोटासा का होईना रोजगार उभा करावा. तसेच कॉलेजच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री. किशोर कदम यांनी नवीन करिअर संधी म्हणून जुलै 2023 पासून सुरु होणाऱ्या इंटिरिअर व फॅशन प्रोफेशनल डिप्लोमा – डिग्री कोर्सेस साठी जिल्ह्यातील सर्व दहावी – बारावी विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी आवाहन केले आहे. तसेंच कॉलेजच्या व्यवस्थापिका मनीषा देसाई, अधिश्री तिवरेकर व मार्गदर्शक सायली तळवडेकर यांच्या कामाचे कौतुक कले तसेच कणकवली च्या मुलांसाठी २३ मे २०२३ पासून पंधरा दिवसाची नवीन बॅच सुरू करत आहोत . यामध्ये सर्व मुलांनी सहभागी व्हावे असे आव्हान व्यवस्थापक मनीषा देसाई यांनी केले.


Spread the love

Related posts

कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी निर्मित आकाश कंदील, उटणे,पणत्या यांचे भव्य प्रदर्शन.

news

अहो आश्चर्य…! आदल्या दिवशी कायम असलेले शिक्षक त्याच शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी कामगिरीवरती तर एकाची बदली.

news

हुमरस येथे रविवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर!

news

Leave a Comment