स्टोरी

कल्याण पूर्वेतील हिंदू नव वर्ष स्वागत यात्रेत विविध विविध जाती – धर्माच्या समाज बांधवांचा उत्सुर्त सहभाग ! यात्रेत सामाजिक एकतेचा दिला अनोखा संदेश !

Spread the love

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – भारतीय हिंदू संस्कृती प्रमाणे सुरु झालेल्या नवीन वर्षाच्या प्रारंभी आणि गुढी पाडव्याच्या भल्या पहाटे कल्याण पूर्वेत हिंदू नव वर्ष स्वागतासाठी निघालेल्या भव्य नव वर्ष स्वागत यात्रेत विविध जाती – धर्म पंथांच्या समाज बांधवांनी उत्सुर्तपणे सहभाग घेऊन सामाजिक एकतेचा अनोखा संदेश दिला .

या यात्रेत हिंदू संस्कृतीच्या विविधांगी छटा पहावयास मिळाल्या .हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रिडा पटांगणा जवळील श्री साई बाबांच्या मंदीरा समोर गुढीचे पुजन करून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला .

या यात्रेत पारंपारिक पद्धतीचा साज असलेले ऊपेश गायकवाड संचालित बासरीवाला ढोल पथक, संबळ वादकास गोंधळी पथक, सम्राट अशोक विद्यालयाच्या कलश धारी विद्यार्थिनी – विद्यार्थी, वारकरी संप्रदायाचे वारकरी पथक, श्री संप्रदायचा रथ, नानिजचे सेवेकरी, जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य, अंगणवाडी बाल विकास संस्थेच्या महिला भगिनी यांचे सह भारतीय इतिहास आणि पुराणातील अनेक घटना दर्शवणाऱ्या आणि वेशभूषा केलेले अनेक वेशभूषा धारी सहभागी झाले होते .उल्लेखनिय बाब म्हणजे या यात्रेत विविध जाती धर्म पंथाचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे विहंगम दृष्य दिसून आले . या यात्रेत बाईक रॅली, सायकल रॅली याच बरोबर पारंपारिक वेषभूषा तसेच सेल्फ व्हिडीओ रिल करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . स्पर्धेच्या गुण प्रदानाचे नियोजन राजेश गरीबे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते .या स्पर्धेतील विजेत्यांना यात्रेच्या सांगता समारोप समयी आयोजकांच्या वतीने गुणानुक्रमे प्रथम – द्वितीय – तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषीके देवून सन्मानित करण्यात आले .कोळसेवाडीतून प्रारंभ झालेली ही रॅली मुख्य बाजार पेठेतून पुढे म्हसोबा चौक, तिसगांव नाका मार्गे तिसाई मंदीराच्या प्रांगणात पोहचल्या नंतर या ठिकाणी यात्रेची सांगता करण्यात आली .या यात्रेत मा . नगरसेवक मनोज राय, अभिमन्यू गायकवाड, नगरसेविका संगिता गायकवाड, प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सौ सविता हिले, कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री महेंद्र देशमुख, सहयोग संस्थेचे विजय भोसले, स्टडी व्हेवचे उमाकांत चौधरी, शिवसेनेच्या पुष्पाताई ठाकरे तसेच सर्वश्री भगवानशेठ भोईर, दत्ता गायकवाड, नरेंद्र सुर्यवंशी, रमाकांत देवळेकर, संजय मोरे, सुभाष म्हस्के, संदिप तांबे, मनोज बेळमकर, विजय उपाध्याय, मनोज डुंबरे, संतोष पाटील, वंदना मोरे, सुशिला माळी, निशा सिंग यांचे सह आंबेडकरी विचारधारेचे सर्वश्री अण्णासाहेब रोकडे, महादेव रामभोळे, अमित सोनवणे, सुबोध भारत, राजु अंकुश, मनोज बेळमकर, केतन रोकडे, अशोक भोसले, पराग मेंढे, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यात्रेच्या सांगता समारोहात यात्रेसाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था संघटना तसेच मान्यवरांचा आमदार गणपत गायकवाड यांचे हस्ते यशोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्र संचलन विष्णू जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदिप तांबे यांनी मानले .


Spread the love

Related posts

कुडाळ मधील शिमगोत्सव कार्यक्रम आणि आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार रात्री तहसिलदार कार्यालया नजिकच्या मैदानावर झाली तुफान गर्दी

news

सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन.

news

नवसाक्षरता अभियानावर शिक्षक संघटनांचा बहिष्‍कार !

news

Leave a Comment