स्टोरी

कलंबिस्त गावातील युवकांने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या दुःखद घटनेने परिसरात खळबळ.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गावातील पास्तेवाडी येतीललाडू पास्ते यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडू पास्ते यांची प्रकृती गेल्या ठीक नव्हती.त्यामुळे त्यांनी या नैराश्यातून आज आपल्या घरातील छताच्या खांबाला दोरीने गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सावंतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा पंचनामा पीएसआय सरदार पाटील, पोलीस हवालदार महेश जाधव आणि अनिल धुरी यांनी तातडीने पूर्ण केला. या आकस्मिक मृत्यूचा अधिक तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करत आहेत.


Spread the love

Related posts

निराधार वृद्ध आजारी अवस्थेत रस्त्यावर तळमळताना पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये केली दाखल.

news

शिवसेना आमदारांच्‍या अपात्रतेविषयी १४ सप्‍टेंबर या दिवशी विधीमंडळात सुनावणी !*

news

कल्याणी घाडी यांचे निधन.

news

Leave a Comment