Uncategorized

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धेच्या विजेत्यांचा उद्या पारितोषिक वितरण समारंभ….

Spread the love

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती निमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी गटात  जान्हवी नंदकुमार दाभोलकर तर दुसऱ्या इयत्ता आठवी ते दहावी गटात गौरवी आनंद कोठावळे इन्सुली हायस्कूल यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

उद्या सोमवार दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी भाषा दिन व जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन मोती तलावाच्या काठी केशवसुत कट्टा येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण होणार आहे ही स्पर्धा शिवजयंती निमित्त शालेय स्तरावरील दोन गटात घेण्यात आली होती. अमोल टेमकर यांनी आपल्या मातोश्री मंदा मंगेश टेमकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली होती. या स्पर्धेत पहिल्या गटात इयत्ता पाचवी ते सातवी द्वितीय कोमल अरविंद पास्ते कलंबिस्त हायस्कूल, तृतीय कस्तुरी हरिश्चंद्र आसयेकर मळगाव हायस्कूल, उत्तेजनार्थ कृष्णा महेश पास्ते सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूल, आरती अजय कोठावळे इन्सुली हायस्कूल तर दुसऱ्या गटात इयत्ता आठवी ते दहावी द्वितीय संचित संजीव पालकर कलंबिस्त हायस्कूल, तृतीय मयुरी महेश कारीवडेकर कारिवडे हायस्कूल, उत्तेजनार्थ अमृता अरविंद पास्ते कलंबिस्त हायस्कूल, दिव्य अनिल कोठावळे इन्सुली हायस्कूल या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धकांच्या निबंधाचे परीक्षण प्रज्ञा मातोंडकर, आदिती अमित सामंत, किशोर नांदिवडेकर, सौ ऋतुजा सावंत भोसले यांनी केले. या सर्व विजेत्या स्पर्धकांनी व शिक्षकांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाला तुतारी संमेलन स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अँड संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत.

प्रसाद परब

ओटवणे येथे २० फेब्रुवारीपासुन ध्रुव चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

प्रसाद परब

मसिआच्या माध्यमातून कोकणातील प्रश्र्नांचा पाठपुरावा करणार.! – उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांचे प्रतिपादन. 

news

Leave a Comment