Uncategorized

स्नेहलता राणे यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले’ राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान…

Spread the love

जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ मध्ये पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत….!

कणकवली : वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ च्या पदवीधर शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून ‘ क्रांती ज्योती सावित्री माई फुले ” राज्य आदर्श शिक्षण गुणगौरव पुरस्कार २०२१ – २२ जाहीर झाला होता. त्यांना हा पुरस्कार मुंबई, बांद्रा येथील रंग शारदा सभागृह येथे राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार कपिल पाटील तसेच अधिकारी व प्रा. जगदीश राणे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्यांच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. हे पुरस्कार क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने संबोधले जातात.सन २०२१ – २२ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारसाठी कणकवली तालुक्यातील वाघेरी गावच्या मूळ रहिवाशी व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगूळवाडी नं १ च्या शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे यांना हा मनाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. आपल्या शिक्षकी पेशात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम स्नेहलता राणे या राबवित असतात. रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल च्या माध्यमातून त्या सामाजिक उपक्रमातही नेहमीच अग्रेसर असतात. साहित्य क्षेत्रातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी विविध संस्थामार्फत गौरविण्यात आले आहे. त्यांना हा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

अत्याधुनिक दर्जाच्या ‘एके-२०३’ रायफली भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल.

news

काश्मिरी पंडिताच्या हत्येने हादरलं जम्मू काश्मीर;….

news

सिंधुदुर्गात भूमिगत वीज वाहिन्यांसाठी ३५४ कोटी ३९ लाखाचा निधी मंजूर…

news

Leave a Comment