Uncategorized

ओटवणे येथे २० फेब्रुवारीपासुन ध्रुव चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

ओटवणे: ओटवणे गावठणवाडी येथील बबलू गावकर मित्रमंडळ यांच्यावतीने शुक्रवार २०,२१ व २२ फेब्रुवारी रोजी भव्य खुल्या ओव्हरआर्म ध्रुव चषक २०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ओटवणे ग्रामपंचायत नजिक मैदानात काँक्रीटच्या खेळपट्टीवर तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गोवा आणि महाराष्ट्रातील आयकॉन खेळाडूंच्या क्रिकेटचा थरार क्रिकेट शौकीनांना पहायला मिळणार आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील प्रसिद्ध समालोचक मालवणीसह हिंदी व मराठीत समालोचन करणार असून या स्पर्धेत निवडक १६ संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. निम्म्या अधिक संघानी या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली आहे. या स्पर्धेत नामवंत खेळाडूंचा समावेश असून क्रिकेट रसिकांना चौकार व षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. ओटवणे सारख्या ग्रामीण गावातील क्रिकेटचा कुंभमेळा टेनिस क्रिकेट युट्यूबवर लाईव्ह पाहता येणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १,५०,००२ रुपये व ध्रुव चषक, द्वितीय पारितोषिक ७५,००२ रूपये व ध्रुव चषक, तृतीय पारितोषिक ३०,००२ रुपये व चतुर्थ पारितोषिक १५,००२ रूपयाचे पारितोषिक तसेच स्पर्धेतील मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज आदी वैयक्तिक पारितोषिके व चषक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघानी आकाश मेस्त्री ९३५६६७२७७४ उदीत गांवकर ७८२०८१४३६५ आणि विशाल गांवकर ९४०४९३०२६० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन गांवकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

देवगड,फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

news

आजचे राशीभविष्य [रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३]

news

भारतीय सैन्य दलात २१ वर्षे ४ महिने सेवा बजावून निवृत्त झालेले निवास सावंत भोसले यांचा होणार सेवा गौरव सोहळा.

news

Leave a Comment