स्टोरी

कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के !

Spread the love

कोल्हापूर: कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत १६ ऑगस्टच्या सकाळी नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपामुळे तिन्ही जिल्ह्यांत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सातारा जिल्ह्यातील पाटण जवळच्या गावांत ग्रामस्थांना भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी’ यांच्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा भूमीपासून ५ किलोमीटर खाली होता. कोल्हापूरात ३.४ रिक्टर स्केल (भूकंप मोजण्याचे परिमाण) भूकंपाचा धक्का नागरिकांना जाणवला. हा भूकंपाचा धक्का सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी जाणवला. या भूकंपाचाही केंद्रबिंदू भूमीपासून ५ किलोमीटर खाली असल्याची माहिती देण्यात आली आहे, तर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरातही भूकंपाचा धक्का जाणवला. चांदोली अभयारण्यापासून १५ किलोमीटर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.


Spread the love

Related posts

विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये लवकरच कॉलेज युनिट स्थापन करणार..!

news

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ २८ जून २०२६”‘ मोहिमेचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शुभारंभ

प्रसाद परब

‘रक्तसंबंधातील नाती’ स्पष्ट करण्याची मनोज जरांगे पाटील यांची नवी मागणी…!

news

Leave a Comment