शिक्षण

शाळांमध्‍ये पहिल्‍याच दिवशी पाठ्यपुस्‍तके मिळणार, १ कोटी ७ लाख विद्यार्थ्‍यांना होणार वाटप!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: नवीन शैक्षणिक वर्षामध्‍ये जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमध्‍ये शाळेच्‍या पहिल्‍यास दिवशी पाठ्यपुस्‍तके मिळणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्‍या राज्‍यातील १ कोटी ७ लाख विद्यार्थ्‍यांना पाठ्यपुस्‍तकांचे वाटप होणार आहे. आतापर्यंत ६९ टक्‍के विद्यार्थ्‍यांना पाठ्यपुस्‍तकांचे वाटप झाल्‍याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्‍यात आली.

शिक्षणाच्‍या नवीन धोरणानुसार इयत्ता १ ते ८ वीच्‍या सर्व विद्यार्थ्‍यांना विनामूल्‍य पाठ्यपुस्‍तके देण्‍यात येणार आहेत. या वर्षी ४ लाख २९ सहस्र पाठ्यपुस्‍तकांची छपाई करण्‍यात आली आहे. या वर्षी केरळ राज्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर पाठ्यपुस्‍तकांमध्‍ये नोंदी ठेवण्‍यासाठी वह्यांची पानेही असणार आहेत. त्‍यामुळे पुढील वर्षी पाठ्यपुस्‍तकांची छपाई नव्‍याने करावी लागणार आहे.


Spread the love

Related posts

बांदिवडे येथे शैक्षणिक साहित्य व गुणगौरव कार्यक्रमउत्साहात संपन्न..!

newss

वेंगुर्ला तालुक्यात आसोली फणसखोल शाळा ज्ञानी मी होणार मध्ये प्रथम..!

news

अल्पसंख्यांकांसाठी सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणार: शालेय शिक्षण मंत्री केसरकर

news

Leave a Comment