स्टोरी

देशाची फाळणी रोखण्याची क्षमता असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर! डॉ. उदय निरगुडकर

Spread the love

सिंधुदुर्ग: १८ एप्रिल (वार्ता.): – १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी देशाची फाळणी झाली, असे नाही, तर वर्ष १८३७ ला अफगाणिस्तान, वर्ष १९०४ ला नेपाळ, वर्ष १९०६ ला भूतान, वर्ष १९०७ ला तिबेट, वर्ष १९३७ ला बर्मा (म्यानमार) आणि वर्ष १९४८ ला श्रीलंका भारतातून फुटून बाहेर पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या सूचना वेळोवेळी कार्यवाहीत आणल्या असत्या, तर कदाचित भारत एकसंध राहिला असता. त्यामुळे देशाची फाळणी रोखण्याची क्षमता असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होय, असे प्रतिपादन माजी ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. ते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित ‘विवेक सभे’त ‘कालातीत ni स्वातंत्र्यवीर सावरकर’ यावर सिटी हायस्कूल येथे झालेल्या व्याख्यानात बोलत होते. या प्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यासह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१.चीनच्या युद्धानंतर जनरल करिअप्पा यांनी ‘वर्ष १९६३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार भारताने कृतीत न आणल्याने म्हणजे सैनिकीकरणावर भर न दिल्याने आज ही स्थिती आली’, असे स्पष्ट सांगितले होते. यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दूरदृष्टी लक्षात येते.

२. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेला राष्ट्रवाद, हिंदुत्व आजच्या पिढीपर्यंत पोचवले नाही, तर समाजात नक्षलवाद फोफावेल.

३. आपली प्राथमिकता केवळ देश असली पाहिजे, असे सावरकर सांगत. मुसलमानांच्या तुष्टीकरणाचा धोका ओळखून त्यावर उपाययोजना सांगणारे ते एकमेव होते.

४. माफीवीर नव्हे, तर केवळ २ वेळा दयेचे आवेदन सादर केले.


Spread the love

Related posts

फरदीन आणि फिरोज खानसोबत शारिरीक संबंध असल्याच्या पाकिस्तानी पत्रकाराच्या आरोपावर अभिनेत्री सेलिनाचं उत्तर!

news

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत रुपेश परब अव्वल.

news

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १२ एप्रिल २०२३ रोजी कल्याण पूर्वेत होणार दणक्यात आगमन !

news

Leave a Comment