स्टोरी

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन ! शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यातील असंरक्षित गडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

Spread the love

रायगड: रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांत अद्भुत असे गडदुर्ग वसलेले आहेत. स्थलदुर्ग, जलदुर्ग आणि गिरिदुर्ग या प्रकारातील गड इथे आहेत. यांतील काही गडांची नोंद पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकात नाही. असे गड वन विभागाच्या अंतर्गत येत असून यावर पुरेसे डागडुजीचे कार्य होत नाही. येथे पर्यटन सुविधा नसल्याने या ठिकाणी स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नाही. महाराष्ट्र शासनाने या गडांकडे लक्ष देऊन पुरेसा निधी संबंधित विभागाला उपलब्ध करून या गडांच्या संवर्धनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान या संघटनेच्या दुर्गसेविका सौ. संध्या दळवी यांनी केली आहे.

सह्याद्री प्रतिष्ठान गेली १४ वर्षे महाराष्ट्रातील गड-दुर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. या संस्थेने विविध गडांवर स्वखर्च आणि लोकवर्गणी यांतून संवर्धनाचे पुढील काम केले आहे. रायगड जिल्ह्यातील सरसगड आणि कर्नाळा येथे प्रवेशद्वारे लावण्यात आली. जंजिरा गडावर कायमस्वरूपी तिरंगा ध्वज, पद्मदुर्गावर तोफांसाठी तोफगाडे आणि भगवा ध्वज लावण्यात आला आहे. कुलाबा गड, कोरलाई गड, उंदेरी गड, कोथळी गड, द्रोणागिरी या गडांवर तोफगाडे बसवण्यात आले. पेण येथील रत्नदुर्ग गडावर महादेव मंदिराचा जीर्णाेद्धार करण्यात आला आहे.

जंजिरा गड
कुलाबा गड
द्रोणागिरी गड
कोरलाई गड
उंदेरी गड
कोथळी गड

लोकसहभागातून दुर्गसंवर्धनाच्या कार्यासाठी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन दुर्गसेविका सौ. नीलम जाधव यांनी केले आहे.



Spread the love

Related posts

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे पुण्यतिथी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात साजरा

news

कारीवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचा पूर्व सैनिक संघटना व भैरववाडी ग्रामस्थ यांच्यावतीने सन्मान.

news

ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने वनऔषधी देणाऱ्या वैद्यांचा सन्मान…!

news

Leave a Comment