वर्धा जिल्हा: पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. व गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरात अवैदय धंदयावर कार्यवाही करीता रवाना असतांना मुखबीर द्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की, सरकारी दवाखाना चौक, हिंगणघाट येथे टिनाचे शर्टर असलेल्या दुकानात काही इसम ईलक्ट्रानिक क्वाईन मशिन वर, चाबी चा वापर करून मशिनवर नमुद असलेल्या नंबरवर पैशाचे हारजितचा खेळ करून विविध आकडे वर पैसे लावुन हारजितचा जुगार खेळत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. श्री. सुशीलकुमार नायक साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट यांना देवून त्याचे आदेशाने सरकारी दवाखाना चौक, हिंगणघाट येथे जावून टिनाचे शर्टर असलेले दोन दुकानात हारजितचा जुगार खेळ खेळत इसलेले इसमांवर दोन ठिकाणी जूगार रेड कार्यवाही करून पंचासमक्ष कायदेशीर रित्या झडती घेतली असता इलेक्ट्राँनिक क्वाईन मशिन व रोख रक्कम सह जु.किं. एकुण 5,14,110/- रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून आरोपीविरूध्द जुगार अँक्ट कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशीलकुमार नायक सा. व मा. पोलीस निरीक्षक श्री अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात सपोनि पद्ममाकर मुंडे सा. डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोहव किशोर कडू,पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी कार्यवाही केली.
previous post
