शिक्षण

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाची NEET मध्ये चमकदार कामगिरी..! ज्ञानेश्वर मामडे यांना ७२० पैकी ६०१ गुण

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी (मारोती एडकेवार): नांदेड नांदेड :बिलोली तालुक्यातील हिप्पारगा थडी येथील अल्पभूधारक शेतकरी तसेच न्हावी समाजातील नागनाथ लक्ष्मण मामडे यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर नागनाथ मामडे यांनी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.ज्ञानेश्वर याने ७२० पैकी ६०१ गुण मिळवत ऑल इंडिया रँकमध्ये ९६४४ वा क्रमांक तर इतर मागास प्रवर्ग (OBC) मध्ये ४२७६ वी रँक प्राप्त केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे ज्ञानेश्वर यांनी केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर हिप्परगा थडी गावाचे नावही उंचावले आहे.त्याच्या या यशाबद्दल गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व विविध स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर कोणतेही यश प्राप्त करता येते,” हे ज्ञानेश्वर मामडे यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.


Spread the love

Related posts

शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई प्रतिष्ठानच्यावतीने बांदिवडे – कोईळ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप!

news

डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश.

news

सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व जि. प. शाळा दि. १५ जून रोजी सुरु होणार! महेश धोत्रे….

news

Leave a Comment