
वेंगुर्ला (तुळस): तुळस ग्रामपंचायतीतील उपसरपंच पदाची निवडणूक आज शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार जयवंत तुळसकर आणि अपक्ष उमेदवार नारायण कुंभार यांच्यात थेट लढत झाली.मतमोजणीनंतर जयवंत तुळसकर यांना ५ मते, तर नारायण कुंभार यांना ६ मते मिळाली. त्यामुळे अपक्ष उमेदवार नारायण कुंभार यांची १ मताच्या फरकाने तुळस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली. या विजयाबद्दल नारायण कुंभार यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांना मतदान करून विश्वास दाखवणाऱ्या सर्व सदस्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
